चंद्रपुरात मनोरंजन सुरू , एकाचा सूर्योदय, दुसऱ्याचा सूर्यास्त होतो,- मीट द प्रेस मध्ये वडेट्टीवारांचा खोचक टोला
स्वतःचे अपयश लपविण्यासाठी सरकार घेत आहे धर्माचा आधार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर ब्युरो.
चंद्रपूर जिल्ह्यात एकाच पक्षातील दोन आमदाराचे जिल्ह्यातील नागरिकांचे मनोरंजन करणे सुरू आहे. सध्या एकाचा सूर्योदय होतो आहे. तर दुसऱ्याचा सूर्यास्त होतो असे चित्र चंद्रपुरात सुरू असल्याचा खोचक टोला लावला. कोरड्या नदीला अचानक पुर यावा, मात्र हे पाणी मात्र उध्वस्त करू नये! सध्या दोन मित्रांना भांडा शौक्यभरे! असे म्हणून या मनोरंजनात जो जिंकेल त्यासोबत आम्ही लढू असे मत विस कांग्रेस गटनेता विजय वडेट्टीवार यांनी मिट द प्रेस येथे व्यक्त केली. मी शिवसेनेत नसतो तर आज नेताही झालो नसतो. सध्या ओबीसी वर्गाचे स्थिती पंख उपडलेल्या पोपटासारखी झाली आहे.
मी माझ्या पक्षात विचाराचा पाईक आहे. मला बाकीच्या सारखे सैनिक व्हायचे नाहीत. जिथे आहे तिथे आनंदी आहे. कुणी काही म्हटले तरी पक्षाची विचारधारा आणि पक्षश्रेष्ठींचा विश्वास माझ्यावर आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विश्रामगृह, नवीन जिल्हा कार्यालयातील भूमी पूजन, गोसीखुर्द प्रकल्प यांना राष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले. इकोनिया प्रकल्प, ब्रह्मपुरी येथील 78% सिंचन पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न अशा अनेक योजना आपण पूर्णत्वास नेल्या. सत्तेचा वापर फार प्रभावीपणे करून पोलिसांच्या गाड्यातून पैशांचे व्यवहार करून आता चोरीचे सरकार आले. आम्ही अल्पसंख्यांक झालो. आर्थिक सल्लागार म्हणून मुख्यमंत्र्यांनी ठेवला म्हणून पवार नाराज झाले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गोची सुरू आहे असेही ते यावेळेस बोलले.
यापूर्वी पंतप्रधान मोदींनी विकासाच्या नावाखाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. आता जनता जागरूक झाल्यानंतर त्यांची दिशाभूल करत स्वतःचे अपयश लपवण्यासाठी धर्माचा आधार घेत आहे. भाजप धर्माच्या आधारावर राजकारण करणारा पक्ष आहे. भाजपा धर्माच्या आधारावर कायदे करतो तर काँग्रेसने कधीही धर्माच्या आधारावर आरक्षण दिले नाही. भाजप स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी धार्मिक मुद्दे उपस्थित करत आहे. धर्माच्या आधारावर भाजप पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीसारखी गुलामगिरीची परिस्थिती निर्माण करणार असल्याची संभावना विस कांग्रेस गटनेता विजय वडेट्टीवार यांनी मिट द प्रेस येथे व्यक्त केली. राज्य सरकारकडून महिला किसान सन्मान योजनेचा लाभ घेणा_यां महिलांना सरकारने 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहन योजना राबवताना सरकारचे होश गेले होते का? असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार म्हणाले की, वर्ष 2024 मध्ये मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक मराठा समाजातील लोक संतप्त होते. त्यामुळे ते मराठा समाजाला एकत्र आणण्यात अपयशी ठरले आणि त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. 2019_24 मध्ये या पाच वर्षांत लोकसंख्या 22 ते 25 हजारांपर्यंत वाढते. परंतु निवडणुकीदरम्यान केवळ 5 महिन्यांत 188 मतदारसंघांमध्ये लोकसंख्या 22 ते 30 हजारांपर्यंत कशी वाढली ही चिंतेची बाब आहे. या निवडणुकीत सत्तेचा प्रभावी वापर करण्यात आला. 2008 मध्ये राज्यमंत्री असताना गोसेखुर्दला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आणि त्याचा विकास करण्यासाठी 4 हजार 990 करोड च्या मंजुरीसह विकास करण्यात आला. ज्यामुळे ब्रह्मपुरी ची 2 लाख 52 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे.
राज्य सरकारच्या भूमिकेवर आक्षेप व्यक्त करताना त्यांनी म्हटले की हे सरकार लोकांच्या हिताचे नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मतभेद असल्याचे दिसून येते. तिघांमधील श्रेय वादामुळे राज्य दिवाळखोरीत निघत आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर एक खोल दरी निर्माण होत आहे. सरकार ग्रामीण विकासाकडे दुर्लक्ष करत आहे. कोणत्याही विकासकामात सत्ताधारी पक्ष स्वतःचा टक्केवारी गोळा करतो. शेतकरी वर्ग पीक विम्यापासून, कर्जमाफी पासून वंचित आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सतत वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार आरएसएसच्या विचारसरणीचे पालन करत आहेत. सरकार प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण करून आरक्षण संपवत आहे. ज्यामुळे भविष्यात जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. शिक्षण धोरणांमध्ये अनेक प्रकारचे बदल केले जात आहेत. अनेक परीक्षांमध्ये विकासाऐवजी धार्मिक विषयांवरील प्रश्नांवर अधिक भर दिल्या जात आहे. यावरून सरकार विकासापेक्षा धर्माला अधिक महत्त्व देत आहे. सध्याच्या परिस्थितीत बहुजन समाज स्वतंत्र भारताचा गुलाम होत चालला आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
संविधानाने सर्व नागरिकांना स्वतंत्र अधिकार दिले आहेत. ज्याद्वारे संबंधित व्यक्ती स्वतःचे मत व्यक्त करू शकते. परंतु सरकारविरुद्ध वक्तव्य केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत आणि कारवाई केली जात आहे. सरकार लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहे आणि ब्रिटिश राजवटीप्रमाणे लोकांना गुलामगिरीत ढकलत आहे. विकासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, सरकार धर्माचा आधार घेऊन आणि अयोध्या किंवा औरंगजेबाच्या कबरी चा मुद्दा उपस्थित करून वाद निर्माण करत स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारच्या अशा भूमिकेमुळे भारताचे तालिबान किंवा पाकिस्तान होण्यास वेळ लागणार नाही असेही ते म्हणाले.