.. या तारखेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तथा आनंद शिंदे यांच्या भिम गीतांचा कार्यक्रम चंद्रपूर.



.. या तारखेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तथा आनंद शिंदे यांच्या भिम गीतांचा कार्यक्रम

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट, चंद्रपूर तर्फे भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्नेहमंच प्रांगण, सेल C.F.P. 07 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारी संचालक, चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट चंद्रपूर आणि सेल एस.सी.एस.टी. कर्मचारी कल्याण संघ, चंद्रपूर यांनी केले आहे.
अनावरण समारंभाच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अनिर्बन दासगुप्ता, प्रभारी संचालक (भिलाई स्टील प्लांट), प्रभारी संचालक (ISP बर्नपूर आणि DSP दुर्गापूर), SAIL यांच्या हस्ते होईल. संजयकुमार गजभाये (कार्यकारी संचालक, CFP चंद्रपूर) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेशबाबू पुगलिया, माजी खासदार, अध्यक्ष (महाराष्ट्र इलेक्ट्रोमेल्ट वर्कर्स युनियन, चंद्रपूर), चंद्रपूरचे जिल्हा अधिकारी विनय गौडा जी.सी. (भा. प्र. से), जिल्हा परिषद, चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन (भा. प्र. से.), चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक, मुम्मका सुदर्शन (भा. प्र. से), चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक विपिन पालीवाल, अजय कुमार चक्रवर्ती, कार्यकारी योजना संचालक (MILSAIL व्यवस्थापन), डॉ. रामकृष्ण, कार्यकारी संचालक (ऑपरेशन), दुर्गापूर स्टील प्लांट, सेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ५.३० वाजता भारतरत्न बाबासाहेब डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुर्णाकृति पुतळ्याचे अनावरण होणार असून, त्यानंतर समता सैनिक दल, चंद्रपूर यांच्या वतीने पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्नेहमंच संकुल, सेल C.F.P. चंद्रपुरात मान्यवर पाहुण्यांचे स्वागत होणार असून मान्यवरांच्या भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्नेहमंचच्या याच प्रांगणात सायंकाळी 07.00 वाजता महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे व संच यांच्या भीमगीत संध्याचा कार्यक्रम असणार आहे. अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत राजेश गायकवाड, राजेश जनबंधू, बाबाराव मून यांनी दिली आहे. चंद्रपुरातील समस्त जनतेने या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान केले.