खांबाडा येथील बोगस डॉक्टर मंडल नी माझ्या मुलीचा जीव घेतला-मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांचा आरोप,
मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांचा आरोप,
डॉक्टरांरावर सदोष मनुष्वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
चंद्रपूर:-
वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे डॉ. रुद्र रॉबीन मंडल हे महाकाली क्लिनिक चालवत असून त्यांच्याकडे कुठलीही विद्यकीय पदवी किंव्हा डिप्लोमा नसताना त्यांनी माझ्या समता मोरेश्वर नाईक, वय ११ वर्षे, हिचवर उपचार केला व चुकीचा उपचार केल्याने तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, माझ्या मुलीचा डॉ मंडल यांनी जीव घेतला त्यामुळे बोगस डॉक्टर मंडल हे दोषी असल्याने त्यांचेवर सदोष मनुष्वधाचा गुन्हा दाखल करावा व माझ्या मृत मुलीस न्याय द्यावा अशी मागणी मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी स्थानिक प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आरोग्य व पोलीस प्रशासनाकडे केली आहें, यावेळी मुलीची आई शिला मोरेश्वर नाईक व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळाबाँधे, सुनील गुढे इत्यादीची उपस्थिती होती, दरम्यान धनंजय बोरीकर या मेडिकल चालविणाऱ्या धनंजय बोरीकर यांच्यावर आरोपीला साथ देण्याच्या गुन्ह्यात कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.
कु. समता मोरेश्वर नाईक, वय ११ वर्षे हिची दि. ३०/०७/२०२४ रोजी प्रकृती बिघडल्यामुळे मुलीच्या वडिलांने तिला उपचाराकरीता महाकाली क्लिनिक डॉक्टर रुद्र रॉबीन मंडल, खांबाडा यांचेकडे नेले होते. त्या दरम्यान डॉक्टर मंडल यांनी तपासणी करुन मुलीला तुराणकर यांच्या खांबाडा येथील लेबोरेटरीमध्ये रक्त तपासणी करण्याकरीता सांगितले होते. त्यानुसार मुलीचे ब्लड तुराणकर यांच्या लॅबमध्ये चेक करुन त्याचा रिपोर्ट सदरच्या डॉक्टरांना दाखविला होता. तो रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी मुलीला गोळ्या दवाई देवून आम्हाला घरी पाठविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. ३१/०७/२०२४ रोजी बुधवारला डॉक्टरांनी मुलीला घेवून तपासणीकरीता दवाखान्यात या असे मुलीच्या वडिलांना मोबाईल वरून फोन करून सांगितलं.त्या दरम्यान डॉक्टरांनी मुलीला १०० एम.एल. ची सलाईन दिली व त्या सलाईनमध्ये डॉक्टरकडेच उपलब्ध असलेले तिन इंजक्शन दिले व काही वेळाने सुट्टी दिली. त्यानंतर आई वडील मुलगी घरी गेल्यावर अर्ध्या तासानी मुलीला थंडी वाजून मुलीचे शरीर हलू लागले व मुलीची प्रकृती जास्तच खराब झाल्याने मुलीने डोळे पांढरे केले. डॉक्टरांनी दिलेल्या सलाईन व इंजेक्शनमुळे मुलगी पुर्णतः लुज/कमकुवत झाली त्यानंतर ती बेहोश झाली. मुलीची अशी अवस्था पाहून आई वडील घाबरले व परत डॉक्टर रॉबीन मंडल, खांबाडा यांच्याकडे तपासणीकरीता घेवून गेले. तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या तोंडावर थंड पाणी मारले व कपडा ओला करुन तिचे शरीर पुसून काढले. त्यानंतर डॉक्टरांनी कोऱ्या चिठ्ठीवर काही औषधी लिहून दिले व काही औषधी त्यांनी मुलीला पाजण्याचा प्रयत्न केला परंतु ती औषधे तिच्या तोंडात जात नसल्याने डॉ. मंडल यांनी पळ काढीत मुलीचा परत एकदा ब्लड चेक करुन दुसऱ्या दवाखान्यात मुलीची तब्येत तपासा असे सांगितले. त्यानंतर मुलीची प्रकृती बघून घाबरलेले वडील यांनी यांनी त्वरीत हिंगणघाट येथील डॉ. वासाडे येथील खाजगी रुग्णालयात तपासणीकरीता घेवून गेले त्यावेळी डॉ. वासाडे यांनी मुलीची तपासणी करुन मुलीच्या वडिलांना सुचविले की, मुलीची प्रकृती फारच गंभीर असल्याने तिला त्वरीत सरकारी दवाखान्यात घेवून जा तर लगेच मुलीला वेळ न घालविता वडिलांनी सरकारी दवाखान्यात घेवून गेले असता डॉक्टरांनी मुलीला एमरजेंसी वार्डमध्ये घेवून गेले व मुलीला तपासण्याच्या दरम्यान मृत घोषित केले. त्यामुळे एका निष्पाप मुलीचा जीव बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या इलाजामुळे झाला असल्याचा दुःखद प्रकार समोर आला.
दरम्यान हिंगणघाटच्या सरकारी दवाखाना मधील डॉक्टरांनी मृतक मुलीच्या वडिलांना सांगितले की, तुमच्या मुलीचा मृत्यु हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे झालेल्या उपचारामुळे झाला असल्यामुळे आपण त्या डॉक्टरा विरुद्ध पोलीसांकडे गुन्हा नोंद करावा असे सुचविले. त्यानंतर वडिलांनी दि. २६/०९/२०२४ रोजी वरोरा ठाणेदार, तालुका आरोग्य अधिकारी तथा सार्वजनिक आरोग्य पथक वरोरा व तहसिलदार वरोरा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला परंतु अजूनपर्यंत महाकाली क्लिनिक रुद्र रॉबीन मंडल, खांबाडा येथील डॉक्टर यांचे विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नसल्याने तो गुन्हा दाखल करावा व माझ्या मुलीला न्याय द्यावा अन्यथा मी आरोग्य विभागा विरोधात आमरण उपोषण करू असा इशारा मृतक मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहें.