अल्पवयीन मुलाच्या अन्याया विरोधात आवाज उठवल्या विरोधात विक्रांत सहारेवर खोटे गुन्हे - पत्रकार परिषदेतून...!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
अल्पवयीन मुलावर अन्याय झाला, त्याविरोधात आवाज बुलंद केला असता युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, भटाळी ओपन कास्ट माईन जवळील कावेरी सी ५ जेव्ही या कंपनीत एक अल्पवयीन मुलगा काम करीत होता, त्या मुलाला बेदम मारहाण करीत कंपनीने कामावरून कमी केले. कावेरी कंपनीने अल्पवयीन मुलाला कामावर ठेवत बाल कामगार कायद्याचे या प्रकरणी पूर्णतः उल्लंघन केले आहे.
अत्पवयीन मुलगा व त्याच्या आईने याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याशी संपर्क करीत न्यायाची मागणी केली. २० मार्च २०२५ रोजी विक्रांत सहारे यांच्यासोबत अल्पवयीन मुलगा व त्याची आई कावेरी कंपनीत गेले, त्याठिकाणी असलेले प्रोजेक्ट मॅनेजर व्यंकटेश्वर रेड्डी यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व तुम्हाला जे करायचे ते करा असे उत्तर दिले. अल्पवयीन मुलाला कामावर ठेवत बाल कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याने विक्रांत सहारे यांनी कामगार आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करीत कावेरी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती, याबाबत सहारे यांना कामगार आयुक्तांचे कारवाई बाबत पत्रही मिळाले. मात्र ३१ मार्च रोजी विक्रांत सहारे यांच्यावर कावेरी कंपनीला ५ लाखांची खंडणी मागीतली म्हणून रामनगर पोलीस स्टेशनमध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
रेड्डी यांनी केलेल्या तक्रारीत २० मार्च रोजी त्यांचे दोन्ही कर्मचारी माझ्या कार्यालयात येत कंपनीविरुद्ध तक्रार का केली याबाबत माझ्या कार्यालयात येत मला विचारणा केली, आणि त्यांना मी म्हणालो की माझा इगो हर्ट झाला माझे १० माणसे कामावर घ्या व ५ लाख रुपये द्या. मात्र तक्रारीत उल्लेख केलेले दोन्ही कर्मचारी माझ्या कार्यालयात कधी आलेच नाही. उलट ज्यांचा तक्रारीत उल्लेख केला आहे. त्यामधील एका कर्मचाऱ्याने हमीपत्र सादर केले कि असा काही प्रकार घडलाच नाही. मॅनेजर रेड्डी यांनी कंपनीमधील कर्मचाऱ्यांची नावे वापरीत हा प्रकार घडवून आणला. व्यंकटेश्वर यांनी खोटे बयाण देत पोलीस विभागाची दिशाभूल केली आहे. पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर पडणार.
बाहेरून आलेल्या कंपन्यांनी कामे करावी जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल, मात्र कायद्याचे उल्लंघन करीत स्थानिक नागरिकांवर अन्याय व्हायला नको, असा अन्याय झाला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित युवासेना याविरोधात आपला आवाज नेहमी बुलंद करणार
बाल कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीने पोलिसांना हाताशी धरून सहारे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, याचा आम्ही निषेध करीत आहो. आज आमच्यावर असा प्रकार घडला तर उद्या कुणीही पोलीसांना हाताशी धरून असे खोटे गुन्हे दाखल करणार. त्या अल्पवयीन मुलाला आम्ही न्याय देणारच, समाजकार्य करताना कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी चालतील. आता या पुढे या खोट्या प्रवृत्तींविरोधात आम्ही कायदेशीर लढा लढणार आहोत. अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून महाविकास युवक आघाडीतील युवक पदाधिकाऱ्यांनी दिली.