उद्याला भव्य श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा, पाच समाजातील सपत्नीक करणार पूजा



उद्याला भव्य श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा, पाच समाजातील सपत्नीक करणार पूजा

चंद्रपूर :

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ६ एप्रिलला चंद्रपुरातील श्री काळाराम मंदिरातील पुजा शोभायात्रेपूर्वी दुपारी ४ वाजता केली जाणार असून, पुजेचा मान बौद्ध, माळी, सुदर्शन, भोई आणि मातंग समाजातील प्रत्येकी एका प्रतिनिधीला देण्यात आला आहे. या पाचही समाजातील प्रतिनिधी सपत्निक उपस्थित राहणार असून त्यांच्याकडून होकार मिळाल्याची माहिती श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा स्वागत समितीचे अध्यक्ष शैलेश बागला यांनी दिली.

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्यावतीने ३ एप्रिल रोजी जनता बीएड महाविद्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला शोभायात्रा समितीचे पदाधिकारी, स्वागत समितीचे पदाधिकारी तसेच सल्लागार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. श्रीरामनवमी उत्सव अत्यंत उत्सहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त चंद्रपूर शहरातील काळाराम मंदिरात दुपारी ४ वाजता पूजा आटोपल्यानंतर शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावर्षीच्या श्रीरामनवमी उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे काळाराम मंदिरातील पुजेचा मान पाच समाजातील प्रतिनिधींना देण्यात आला आहे. बौद्ध, सुदर्शन, भोई, माळी आणि मातंग समाजातील प्रत्येकी प्रतिनिधी सपत्निक पुजेला हजर राहतील. बौद्ध समाजातील भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बाळू उर्फ प्रवीण खोब्रागडे हे सपत्निक काळाराम मंदिरातील पुजेला
श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीची माहिती
उपस्थित राहतील. त्यांनी तसा होकार दर्शविला असल्याचे शैलेश बागला यांनी सांगितले. माळी समाजातून राजू बनकर,नंदू नागरकर, रवी गुरूनुले यांची नावे आली असल्याचेही त्यांनी सांगितले. पुजेनंतर शोभायात्रा काळाराम मंदिराजवळून जोड देउळ, गांधी चौक, लक्ष्मीनारायण मंदिर, जटपुरा गेट, स्वामीनारायण मंदिर, गिरनार चौक मार्गे, काळाराम मंदिर येथे पोहोचणार आहे. शोभायत्रेच्या मार्गावर विविध समाजासेवी आणि धार्मिक संस्थाद्वारा प्रभरामचंद्राच्या रथाचे पुजन करण्यात येईल. शहरात सर्वत्र जवळपास शंभर स्वागतद्वार लावण्यात येणार आहे. रामायणातील विविध घटनांच्या देखावे तयार करण्यात येणार आहे. शोभायात्रा काळाराम मंदिरात पोहोचल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, असे स्वागत समितीचे अध्यक्ष शैलेश बागल यांनी सांगितले.