संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ऑनलाइनचे दु:खणे !




संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ऑनलाइनचे दु:खणे !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचा पुरावा हा आता ऑनलाईन करावा लागत असल्याने वयोवृद्धासह निराधार लाभार्थ्याचे दुखणे, डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वी हयातीसाठीलाभार्थ्यांना आधार कार्ड, बँक खाते क्रमांक लिहून फॉर्म भरून तहसील कार्यालयात जमा करावे लागत असे. मात्र शासनाच्या नवीन धोरणानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्जासाठी सेतू आधार केंद्रावर जाऊन आधाराला मोबाईल नंबर लिंक करून त्यावर डी ओ बी नंबर घेऊन त्याची पावती जोडून तहसील कार्यालयात जमा करावी लागत आहे.
शासनाच्या या ऑनलाइन जटिल प्रणालीमुळे वयोवृद्ध निराधारांना रखरखत्या उन्हात आधार केंद्र वर जाऊन तातकाळात राहावं लागत आहे. सध्या चंद्रपूर शहरातील तापमान 40° च्या वर गेले आहे. अशा उन्हामध्ये वयोवृद्ध महिला पुरुषांना आपल्या हयातीच्या प्रमाणपत्रासाठी जीवाची परवा न करता आधार केंद्रावर आपले हयातीचे प्रमाणपत्र लिंक करण्यासाठी तासंतास बसावं लागत असल्याची खंत वयोवृद्ध महिला (सखुबाईने) काल्पनिक नाव हिने शासनाच्या विरोधात या जटील योजनेच्या ऑनलाइन प्रणाली बदल नाराजी व्यक्त केली. यापूर्वी असलेले संजय गांधी निराधार चे फार्म सरळ आणि सोपे होते. परंतु या ऑनलाइन प्रणालीत आधारला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी दिवसभर येऊन तातकाळत बसावे लागतात. सोबतच त्यांना शंभर दोनशे रुपयांचा फटका ही बसतो. यासोबतच या उन्हाच्या तळाक्यात जीव लाहीलाही करीत असल्याचीही त्यांनी माध्यमातून बोलून दाखवले.