सावली पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यावर केले खोटे गुन्हे दाखल. मनसे पदाधिकाऱ्यांची पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.




सावली पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यावर केले खोटे गुन्हे दाखल.

मनसे पदाधिकाऱ्यांची पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

मनसे पदाधिकारी यांनी आडवीतीडवी हायवा गाडी चालवत असलेल्या गाडीला अडवून दारू पिऊन गाडी चालविणारया ट्रक ड्राइव्हर विरोधात सावली पोलीस स्टेशनं येथे मोबाईल वरून तक्रार केली असतांना व रेती चा ट्रक असल्याने RTO निरीक्षक पायघन यांना सुद्धा फोन करून बोलावले असतांना सावली पोलीस स्टेशनं येथे ट्रक ड्राइव्हर वर दबाव टाकून व त्याला मारझोड करून मनसे पदाधिकाऱ्या विरोधात लिहिलेल्या तक्रारीवर सही करण्यास लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याने या खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या सावली पोलीस अधिकाऱ्यांची मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषद घेऊन केली आहें, यावेळी ज्या ट्रक ड्राइवर ला मारहान करून खोटी तक्रार द्यायला लावली तो ट्रक ड्राइवर पत्रकार परिषदेत उपस्थित असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहें.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची सावली तालुक्यातील हिरापूर टोल नाक्यावर शाखा उदघाटन करण्यासाठी मनसे पदाधिकारी अमन अंधेवार, राजू कुकडे, महेश वासलवार व सुनील गुढे हे दिनांक 7/4/2025 ला सायंकाळी 5.30 वाजता गेले होते व त्यांनंतर परत येताना सायंकाळी 6.30 वाजता मनसे पदाधिकारी परत निघाले असतांना खेडी फाटा जवळ एक हायवा ट्रक आडवा तिडवा जातं असतांना दिसला त्यामुळे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी या ट्रक मुळे समोर अपघात होऊ नये यासाठी तो ट्रक थांबवला, ट्रक मधून ड्राइव्हार बाहेर आल्यानंतर ड्राइव्हार दारू पिऊन असल्याचे लक्षात येताच व गाडीत रेती असल्यामुळे त्यांनी RTO निरीक्षक पायघन यांना फोन केला त्यानंतर सावली पोलीस स्टेशनं उपनिरीक्षकमुसळे यांना फोन केला मात्र ते उशिरा म्हणजे पाऊण तासाने आले त्या दरम्यान उभ्या असलेल्या ट्रक ला एक ऑटो येऊन धडकला व पलटी झाला तो ऑटो ड्राइवर सुद्धादारू पिऊन होता,

दरम्यान मनसे पदाधिकारी यांनी ऑटो चालकाला मदत करून त्याचा पलटी झालेला ऑटो उभा केला दरम्यान पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी सर्व पाहणी केली आणि ट्रक ड्राइव्हर ला ट्रक सावली पोलीस स्टेशनं येथे लावायला लावला आणि मनसे पदाधिकारी यांना पीएसआय मुसळे यांनी सांगितले की आम्ही ट्रक ड्राइव्हर वर ड्रॅंक अँड ड्राईव्ह चा गुन्हा दाखल करतो मात्र ऑटो वाल्यावर ड्रॅंक अँड ड्राईव्ह चा गुन्हा दाखल करणार नाही आता तुम्ही जाऊ शकता असे म्हणाले, दरम्यान मनसे पदाधिकार्यांना पोलीस स्टेशनं सावली येथे बोलावले नसल्याने मनसे पदाधिकारी चंद्रपूर ला पोहचले असतांना सावली पोलिसांनी ट्रक ड्राइव्हर वर दबाव आणून व त्याला मारझोड करून मनसे पदाधिकारी यांच्याविरोधात स्वतः तक्रार तयार करून त्याची सही घेतली आणि खोटा गुन्हा दाखल केला त्यामुळे मनसे पदाधिकारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक राष्ट्रीय मानावाधिकार आयोग व राज्य मानवी हक्क आयोगमुंबई यांना निवेदन देऊन खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहें.