लोकल बॉडीने शहरातील नागरिकांच्या जनभावना सामोर येतात-मीट द प्रेसमध्ये मनपा आयुक्त पालीवाल यांची सकारात्मक भूमिका
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर ब्युरो. :-
शहरी विकास म्हणजे शहरी भागांचा विकास किंवा सुधारणा करणे होय. शहरी विकासाशी संबंधित पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि सेवांचा विकास, शहरी भागातील लोकसंख्या वाढ, सुधारणा आणि विस्तार, आर्थिक विकास, सांस्कृतिक गतिमानता आणि शहराचा विस्तार या गरजा पूर्ण करण्यासाठी शहराच्या हद्दवाढी वर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी मीट द प्रेस मध्ये सकारात्मक भूमिका दर्शविली आहे.
यावेळी आयेाजित मीट द प्रेस मध्ये मंचावर अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सचिव प्रविण बतकी उपस्थित होते. आयुक्त पालिवाल यांचे योगेश चिंधालोरे यांने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पंकज मोहरील यांनी तर प्रास्ताविक मजहर अली यांनी केले.
दरम्यान आयुक्त पालीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, सध्या निवडणुकांना होणारा विलंब लक्षात घेऊन महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. परंतु निवडणुकांना विलंब झाल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. महानगरपालिकेतील महापौर, विविध विभागांचे अध्यक्ष आणि सदस्यांना सोबत घेऊन प्रत्येक कामात सहकार्य मिळते. महानगरपालिकेची लोकल बाडी प्रत्येक कामात आपले विचार व्यक्त करतात त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेत काम करताना, कोणत्याही विषयावर निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा लागतो. भारत हा एक लोकशाही देश आहे आणि लोकशाही देशात लोकप्रतिनिधींना सोबत घेणे महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेत आमसभा दरम्यान सदस्य त्यांच्या प्रभागातील लोकांच्या समस्या बैठकीत मांडतात. ज्यामुळे जनभावना समोर येते आणि त्यावर योग्य निर्णय घेता येतात. महानगरपालिकेत वारंवार होणा_यां आरोप-प्रत्यारोपांवर त्यांनी असे मत व्यक्त केले की, जोपर्यंत आपण नियमांनुसार पुढे जात आहोत तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या आरोपांना काही फरक पडत नाही. शहरात नदी असने हे वरदान असते त्यामुळे पाण्याचा श्रौत वाढण्यास मदत होते. नदीच्या पात्रातील खोलीकरण, रूंदीकरण आणि तिचे संगोपन करणे आवश्यक आहे.
नदी प्रदुषणावर नदीला प्रदूषित होण्यापासून रोखण्यासाठी शहरात सांडपाणी वाहिन्या असणे आवश्यक आहे असल्याचे त्यांनी व्यक्त केले. येत्या काळात शहरातील एकमेव रामाळा तलावाचे सौंदर्य जपण्यासाठी भिंती बांधण्याचे काम सुरू केले जाईल आणि माच्छिनाल्यांचे एसपीजी प्लांटद्वारे स्वच्छ करून रामाळा तलावात सोडले जाईल. महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी, मालमत्ता कर वसुली, पाणी कर वसुली इत्यादींवर अधिक भरपाई देण्याबाबत माहिती देण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या विस्तारात महापालिका आयुक्त विपिन पालीवाल यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. पण जनताच या कामात अडथळे निर्माण करतात. ज्यामुळे शहराचा विकास पाहीजे तसा होत नाही असे मत महापालिका आयुक्त विपिन पालीवाल यांनी व्यक्त केले. संचालन योगेश चिंधालोरे यांनी केले. यावेळी चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी साप्ताहिक वृत्तपत्राचे पत्रकार, न्यूज पोर्टलचे पत्रकार उपस्थित होते.