एअरटेलच्या इंटरनेट वायफायची ग्राहकांना डोकेदुखी ! सर्विस यंत्रणा कुछ कामी !




एअरटेलच्या इंटरनेट वायफायची ग्राहकांना डोकेदुखी !
सर्विस यंत्रणा कुछ कामी !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जग एकीकडे इंटरनेट कनेक्शन ने जोडल्या जात आहे. ग्राहक सुविधे करता इंटरनेटचा वापर करीत आहे. परंतु मागील चार-पाच दिवसापासून एअरटेलच्या सर्विस ने ग्राहकाची डोकेदुखी वाढवली आहे. एअरटेलच्या सर्विस यंत्रणा कुछ कामी झाली आहे.
असाच प्रकार चंद्रपुरात मागील वादळ- वारा आलात तेव्हापासून चार-पाच दिवस होऊन सुद्धा एअरटेलचा वाय-फाय सुरू झाल्या नसल्याने ग्राहकांची फार मोठी डोकेदुखी वाढली आहे. एअरटेल चा इंटरनेट वायफाय बंद असल्याने, ग्राहकांची अनेक कामे खोळंबली आहेत. संबंधित कंपनीला ग्राहक सेवा केंद्रात सुद्धा याची तक्रार करू नये कुठलीही दखल घेतल्या जात नाही. भविष्यात एअरटेल एक नाममात्र असेल असे ग्राहकात आता संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे देश प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान करीत आहेत. दुसरीकडे एअरटेल सारख्या इंटरनेट वायफायने ग्राहकांना त्रास देणे सुरू केले आहेत. याची झळ पूर्ण चंद्रपूर शहरात पोहोचली आहे.
संबंधित सर्विस यंत्रणा ही कुछ कामी झाली आहे. या संदर्भात एमएसईबी चा विचार केल्यास जिल्ह्यातील संपूर्ण लाईट बंद असताना काही तासाच्या अवधीतच सर्विस देऊन ग्राहकांचे समाधान केले. मात्र मागील काही दिवसापासून एअरटेलच्या या सर्विस यंत्रणेमुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांचा इंटरनेट कनेक्शन संपल्यास दोन दिवसा अगोदरच आपला बॅलन्स संपत असल्याची माहिती ग्राहकांना देत असतात. आणि लगेच बॅलन्स संपता सर्विस बंद करतात. दुसरीकडे मात्र ग्राहकांना चार-पाच दिवसापासून बंद असलेल्या सर्विस वर कुठलीही भरपाई दिली जात नाही. यामुळे ग्राहकांची एअरटेल विषय चांगलीच नाराजी व्यक्त होत आहे.