घरकुल लाभार्थ्यांची होतोय आर्थिक पिळवणूक !
दलाला 5000 रुपये देऊनही घरकुलाचा निधी नाही...!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
केंद्र सरकारच्या योजनेतून लाभार्थ्यांना केंद्र व राज्यांच्या माध्यमातून मिळणारे अनुदान हे घरकुल बांधकामाच्या लाभार्थ्यांना मिळत असतो. अनेक योजनेतून सर्वांना घरे मिळावे ही माननीय पंतप्रधानांची योजना असून या योजनेला स्थानिक पंचायत स्तरावरील कर्मचारी दलालाच्या मार्फत लाभार्थ्यांची पिळवणूक करीत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या, महात्मा गांधी रोजगार हमी योजना व ग्रामीण गृहनिर्माण योजना घरकुल या कार्यालयात चिचपल्ली येथील मागील एक वर्षांपूर्वी घरकुल प्राप्त नाव यादीत असलेली लाभार्थी शालू पेंदाम चे वर्षाभरापासून घरकुलाचे काम रखडले आहेत. या रखडलेल्या कामाचा दुसरा चेक काढण्यासाठी रवी... नावाच्या दलालाने चंद्रपूर पंचायत समितीच्या अभियंत्याच्या नावाने 5000 रुपये घेतल्याचा आरोप चिचपल्ली येथील या आदिवासी महिलेने केला आहे.
वारंवार ही महिला कार्यालयात घरकुल योजनेच्या कार्यालयात खेटरा मारून हतास झाली. परंतु तिला कुठलाही प्रसिसाद मिळत नसल्याने तिने आपली आप भीती माध्यमा समोर सांगितली.
यापूर्वी पंचायत समिती ग्रामीण गृहनिर्माण योजनेत एका अभियंत्याला लाज लूचपत विभागाने अटक केली होती.
एवढे होत असताना सुद्धा घरकुल बांधकामाच्या लाभार्थ्यांना नाहक त्रास देण्याचे काम सुरू असल्याचे अनेक घरकुल लाभार्थ्याकांकडून बोलल्या जाते. परंतु कुणीही समोर येऊन आपली आपबिती सांगण्यास तयार नसतात. कारण समोर आल्यास येथील अधिकारी कर्मचारी त्यांना या योजनेपासून त्रास देण्याचे मनसुबे तयार करतात!यामुळे सर्वसाधारण सामान्य नागरिकांना या घरकुल योजनेपासून वर्षं वर्ष तात्काळात राहावं लागतं.
आता शासनाकडून घरकुल बांधकामाच्या अनुदानात वाढ केली आहे. त्याचा फायदाही आता घरकुलधारांना होत असला तरी यावरही कमिशन खोरी आडवी येईल यात काही शंका नाही?