जगद्गुरु दयानंद पुरी स्वामींच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा१६मार्चला दारव्ह्यात होणार सत्कार ywatmal दरवळ




जगद्गुरु दयानंद पुरी स्वामींच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा१६मार्चला दारव्ह्यात होणार सत्कार

दिनचर्या न्युज :-

यवतमाळ(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

जागतिक महिलादिनचे औचित्य साधून राज्यातील कोष्टी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक१६मार्च२०२५रोजी सकाळी११वाजता दारव्हा येथील निधी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,जगद्गुरु श्री श्री दयानंद पुरी स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा होत आहे.सोहळ्याच्या निमित्ताने अलीकडेच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सतीष दाभाडे यांनी दारव्हा येथे मेळावा संदर्भात आढावा घेतला.मेळाव्याच्या संदर्भाने सुरु असलेल्या तयारीबाबात समाधान व्यक्त केले.या सोहळ्यामध्ये समाजातील कर्तृत्ववान महिलांचा स्वामीजींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.यावेळी कोष्टी परिषदेचे अध्यक्ष अरुण वरोडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.या सोहळ्याच्या निमित्ताने विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदर्भातील कोष्टी समाज बांधव व भगिनींकडुन परिषदेला सहकार्य मिळत आहे.मेळाव्यापूर्वी सोहळ्याच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आढाव्याच्या वेळी समाजसेवक तथा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव नारायणराव वड्डे,शोभा वड्डे,विदर्भ कार्याध्यक्ष विलास गोरख,विदर्भ संघटक नरेंद्र माहुरे,विदर्भ उपाध्यक्ष विलास भड,विभागीय पदाधिकारी किशोर सरोदे,नागपूर कोष्टी परिषदेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जुमळे,परिषदेच्या महिला प्रतिनिधी सुनीता अलोणे,क्रिष्णराव पिंगे,स्वानंद देशकर,हर्षल अलोणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कोष्टी परिषदेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुधीर अलोणे यांनी सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती दिली.