मूल येथे नवभारत कन्या विद्यालय समोर सुरु असलेले आंदोलन वेठीस धराला लावणारे षडयंत्र - सामाजिक कार्यकर्ते भोला मडावी
पिटीशन मागे घेतल्यास आम्ही ऑर्डर देण्यास तयार- संस्था अध्यक्ष
आकाश सिडामने तिऱ्हाईत माणसाचे न ऐकता स्वतःचे भले करावे... !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आदिवासी महिला, यांचा आक्रोश , दिवंगत पतीच्या जागी मुलाला नोकरी दया.,..! सदर मागणीला धरून
मुल येथे नवभारत कन्या विदयालया समोर २६ मार्च पासून आंदोलन सुरु आहे .याआधीही 1 वर्षा आधी सदर धरणे आंदोलन झाले होते त्याची नोंद घेत सामाजिक कार्यकर्ते प्रब्रम्हानंद मडावी,प्रियंदर्शन मडावी लक्ष्मण सोयाम अशा अनेक जागरूक समाजाच्या शिस्ट मंडळाने संस्था चालक तथा तहसीलदार शिक्षण अधिकारी अशा प्रशासनिक कार्यवाहीला जाब विचारला होता.पण आकाश सिडाम ह्याने परत 26 मार्च पासून परत आंदोलन उभारल्याने व सार्वजनिक माध्यमावर माहिती प्रसारीत केल्याने मुद्दा परत का उफाळून आला याची चौकशी व्हावी असे आदिवासी समाजातील वरिष्ठ लोकांकडून भोला मडावी यांना सूचना आल्या व त्यामुळे भोला मडावी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मागील शिष्ठमंडळ यांना घेऊन आंदोलनाच्या ठिकाणाला भेट दिले व सर्व सहानिशा केली आणी संस्था चालकाकडे तात्काळ बैठक बोलावून वास्तविकता जाणून घेतली.
त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष एड. अनिल वैरागडे म्हणाले की, आकाश चे वडील मुनीम यांचा या संस्थेत नोकरीवर असताना मृत्यू झाला. त्यामुळे ती जागा अजूनही रिक्त आहे. यांचा जेव्हा अनुकंपासाठी अर्ज आला. तेव्हा आईचे नाव होते. नंतर आईने मुलाचे नाव समोर करून अर्ज केला. त्यावेळेस बाबासाहेब वासाडे अध्यक्ष होते. त्यानंतर मला माहित झाले, तेव्हा त्यांचा अर्ज मी अनुकंपासाठी पाठपुरावा करून पाठवला. अनुकंपा यादीमध्ये दहा लोक आहेत. त्यात आकाश चा नंबर अनुकंपा यादीत पाचव्या नंबर वर आहे. त्यात काही अडचणी होत्या. पण ह्या कोणाचे तरी ऐकून वारंवार उपोषणाला बसतो. ज्या 26 लोकांचे प्रकरण हायकोर्टात पेंडिंग आहेत. त्यांच्यात आकाश चे नाव पिटीशन म्हणून दाखल आहे. आकाश हा अनुकंपा तत्वावर लागण्यासाठी अर्ज प्राप्त झाला आहे. मात्र या संस्थेमध्ये काही जागा नसताना विनाकारण जागा भरण्यात आल्या होत्या.. वर्ग तुकड्या मुलांची संख्या नसताना अशा लोकांना संस्थेत सामावून घेता येणार नाही. मग यांना नियमित पगार द्यायचा कुठून असा प्रश्न उपस्थित झाला. अनुकंपात असताना सुद्धा यांनी कोर्टात पिटीशन पार्टी म्हणून दाखल आहे. अशा परिस्थितीत त्याला ऑर्डर देणे बरोबर नाही. म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यांनी आपल्या पद्धतीने काय निर्णय घ्यावा असे पत्र दिले.
यांनी हायकोर्टातून पिटीशन मागे घेतल्यास आम्ही एक तासाच्या आत त्याला संस्थेत सामावून घेऊ. असे ते म्हणाले. कुठल्याही प्रकारची आमची नाही नसताना संस्थेची बदनामी दुसऱ्याच्या सांगण्यावरून करू नये. असे ते माध्यमासमोर बोलले.
सदरहू विषयाच्या अनुषंगाने मुलाची बाजू अशी आहे की, मुलगा, आकाश मुनिम सिडाम, शैक्षणिक पात्रता बी एस सी,याला पती मुनिम सिडाम यांचे निधनानंतर, अनुकंपा तत्त्वावर, नवभारत कन्या विद्यालय येथिल रिक्त प्रयोग शाळा सहाय्यक पदावर,शासन निर्णय व उच्च न्यायालय यांचे निर्देशाप्रमाणे नियुक्ती देण्यासाठी बुधवार दिनांक २६ मार्च २०२५ सकाळी १०:०० पासून नवभारत कन्या विद्यालय मुल समोर श्रीमती हर्षकला सिडाम यांनी उपोषण सुरू केले आहे
शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे पत्र क्रमांक/ जिपचं/ शिक्षण (माध्य.)/ १८२५/२०२३ दिनांक २७ जुन २०२३ व पत्र क्रमांक १८९०/२०२३ दिनांक ६ जुलै २०२३ व दि. २५ मार्च २०२५ निर्देश दिले आहे
हर्षकला सिडाम यांनी अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीबाबत अर्ज,दि.१२ एप्रिल २०२३, दि.२१ एप्रिल २०२३, दि.१० जुलै २०२३ व दिनांक २० मार्च २०२५ दिलेले आहे
मा उच्च न्यायालय याचिका क्रमांक.५१२६/२०२३,निर्णय दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४
उपरोक्त संदर्क्क्री माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे पत्र हर्षकला यांचे पती मुनिम उद्धव सिडाम, यांचे दिनांक २४ ऑगष्ट २०१७ ला निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर मुलगा आकाश मुनिम सिडाम, शैक्षणिक पात्रता बी एस सी,याला संस्थेतील नवभारत कन्या विद्यालय, येथे विज्ञान सहाय्यक पदावर नियुक्तीसाठी अनेक वेळा विनंती अर्ज केले आहेत, मा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे पत्र क्र.शिबिर अ/ टे-९ /२३१० /२०२१ दिनांक ६ सप्टेंबर २०२१ अन्वये नवभारत कन्या विद्यालय, मुल येथे प्रयोगशाळा सहाय्यक यादी क्रमांक ३९ येथे पद रिक्त आहे तसेच दिनांक ३१ मार्च २०२३ ला श्री अशोक येरमे, विज्ञान सहाय्यक यांचे सेवानिवृत्तिने रिक्त झालेल्या जागेवर विज्ञान सहाय्यक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे.
मा उच्च न्यायालय याचिका क्रमांक ५१२६/२०२३ निर्णय दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४ अन्वये उतारा क्रमांक चार मधे " He also make stetment that he has no grievance against respondent no.4, (Akash Sidam),if he appointed on compassionate ground " स्पष्ट करण्यात आले आहे.
मुलगा आकाश मुनिम सिडाम याला विज्ञान सहाय्यक पदावर अनुकंपा नियुक्ती देण्यात आलेली नाही त्यामुळे सिडाम कुटुंबाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे बुधवार दिनांक २६ मार्च २०२५ सकाळी १०:०० पासून नवभारत कन्या विद्यालय मुल समोर बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे असे स्पष्ट झाले.
नंतर नवभारत कन्या विद्यालायचे अध्यक्ष व संस्थेचे अधिकारी यांची बैठक घेतली.तेव्हा मुळात सन्नस्थेचे अध्यक्ष यांनी आम्ही मुलाला नौकरी द्यायला तयार आहोत.मागेही होतो व आताही आहो.परंतु हा वास्तव लक्षात न घेता ति-हाईत व्यक्तीच्या ईशाऱ्यावर असे वारंवार करतो आहे असे सांगितले .व सर्व पुरावे समोर ठेवले.त्यामुळे भोला मडावी यांनी तात्काळ आकाश सिडाम यालाही बोलावून घेतले व आमोरा समोर सत्य काय हे जाणून घेतली तर आकाश सीडाम हा खरंच दुसऱ्याच्या ईशारा धरून वागतो आहे हे स्पष्ट झाले.
मुळात आकाश सिडाम याची जागा अनुकंपाची असून त्याच्या वडिलाच्या जागेवर त्याला नौकरी देणे हे शासन निर्णय व शिक्षणा अधिकाराच्या आदेशान्वये बंधनकारक आहे.व संस्था ह्या गोष्टीला पूर्णतः स्वीकारते व नौकरी देण्यास तयार सुद्धा आहे परंतु तिसऱ्या माणसाचे ऐकून आकाश सिडाम यांनी कोर्टात केस दाखल असलेल्या चतुर्थ क्रमाकानुसार् कोर्टाला न्याय मागितल्या मुळे सारा घोळ झाला.मुळात आकाश सीडाम याची केस अनुकंपाची असून इतर 31 लोकाशी काहीच संबंधित नाही.त्यामुळे कोर्टाने आकाश सीडाम याला त्या प्रिटिशन नुसार तु अनुकंप ह्या पदाकरिता असल्या कारणाने ह्या प्रिटिशनचा तु का म्हणून भाग झाला असे उत्तर देण्याकारिता त्याला आदेश केला आहे.आकाश आणी इतर 31 चा काही संबंध नाही कारण त्यातल्या 26 लोकांचा नवभारत कन्या विद्यालयाच्या जुन्या अध्यक्षासोबत परस्पर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आहे ती प्रिटिशन आहे.त्यामुळे अनुकंपाचा आणी ह्या प्रितीशनाचा काही एक संबंध नाही.परंतु तिऱ्हाईत व्यक्तीने हेतूपुरस्सर् आकाशला प्रिटिशन मध्ये गोवून घेतले.त्यामुळे आकाशाच्या नासमझी अल्प माहितीच्या आधारावर त्याला अजुनपर्यंत नौकरीचा आदेश संस्थेकडून देण्यात आला नाही.ही वस्तुस्थिती आहे.
संबंधित संस्था चालकाने संबंधित विषय शिक्षणाधिकारी यांना 27/03/2025 रोजी लेखी निवेदना द्वारे कडवीला असून त्यात संस्थेची भूमिका ही नौकरी देण्याची आहे त्यासाठी आकाश यांनी यांना त्या 32 लोकांच्या प्रिटिशन मधून स्वतःचे नाव मागे घेणे गरजेचे आहे,कारण हा त्या प्रीटिशनाचा भाग असल्याने त्याला एकाला जर ऑर्डर दिला तर उर्वरित 31 लोकांचा सुद्धा दावा खरा ठरेलं व त्यांना ही नौकरी द्यावे लागेल.जेव्हा की तितके रिक्त पदे संस्थेकडे उपलब्ध नाही.शिवाय कोरोना काळातील लोकांनाही नौकरी देण्याचा शासन निर्णय असल्याने.तूर्तास अशा तीन लोकांना नौकरीवर रुजू करून घेता येईल ज्यात आकाशाचाही समावेश असेल असे लिखित कडविले आहे.व तशी संस्था चालक यांनी भोला मडावी व आकाश यांनी आणी पत्रकारांना पुराव्या निशी सांगितले आहे.
एकंदरीत अल्प माहिती व आदिवासी समूहाच्या साध्या भोळ्या स्वभावाचा हा तिऱ्हाईत व्यक्ती गैरवापर करतोय.यात संस्थेचा काही एक संबंध नाही.परंतु उर्वरित 31 लोका पैकी 26 लोकांसोबत या आधीच्या संस्था अध्यक्षाने आर्थिक गैर व्यवहार करून फसवणूक केली.ही बाब स्पष्ट आहे.परंतु अनुकंपाचा आणी त्या केसचा काही एक संबंध नाही.हे स्पष्ट होते.त्यामुळे आकाश ची खरी फसवणूक ही संस्था करत नसून तो तिऱ्हाईत व्यक्ती करत आहे हे उघड झाले.