आजाद बगीच्यात होतोय ध्वनी प्रदूषणाने नागरिकांना त्रास !




आजाद बगीच्यात होतोय ध्वनी प्रदूषणाने नागरिकांना त्रास !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील जनतेचे एकमेव प्राणवायू समजणाऱ्या मौलाना अब्दुल कलाम आजाद बगीच्यात शहरातील सर्व वार्डातील नागरिक सकाळी पाच वाजता पासून, शुद्ध हवा मिळावी म्हणून या ठिकाणी येत असतात. येते सकाळी पक्षांचा किलबिलाट ऐकण्यासाठी शहरातील नागरिक वयोवृद्ध , छोटे मुले या बगीच्यात येत असतात. परंतु काही वर्षापासून आजाद बगीच्यात झुम्मा सुरू करण्यात आला. या झुम्म्यासाठी साऊंड बॉक्स वाजवल्या जाते. त्या साऊंड बॉक्स चा आवाज ध्वनी प्रदूषण होण्यात सुरुवात झाली. या एका झुंम्याचे आता तीन-तीन झुम्मे झाल्यामुळे आजाद बगीच्यात सर्वीकडे ध्वनी प्रदूषणाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील पक्षांना त्रास होत असून वयोवृद्ध नागरिकांनाही ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणे सुरू झाले आहे. याच बगीच्यात ज्येष्ठ नागरिकांचे योग अभ्यास सुरू असतात. त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.या झुम्यातील
गटबाजीमुळे आजाद बगीच्यात आता तीन-तीन साऊंड बॉक्स वाजवून ध्वनी प्रदूषण सुरू झाले आहे.
येथे सकाळी मॉर्निंग वॉकला येणारे निलेश धामणगे माध्यमांना सांगताना म्हणाले की, या ठिकाणी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, आणि शांत वातावरण राहावं यासाठी सकाळी एकमेव शहरात असलेल्या बगीच्यात नागरिक फिरण्यासाठी येतात. परंतु काही दिवसापासून या ठिकाणी झुम्माच्या नावावर मोठ्याने साउंड बॉक्स लावून ध्वनी प्रदूषण सुरू झाले आहेत
या ध्वनी प्रदूषणावर चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी इथे होत असलेल्या प्रदूषणावर बंदी घालावी.
आणि नागरिकांना सकाळचा मोकळा श्वास घेऊ द्यावा ही मागणी आता नागरिकाकडून होत आहे.