जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पटवारी संघाचे एकदिवसीय धरणे आंदोलन
या तारखेनंतर ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी बेमुदत सामुहिक रजा काम बंद आंदोलन... !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी यांच्या आर्थिक व सेवाविषयक मागण्या निकाली काढण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, मा. उपविभागीय अधिकारी, मा. तहसिलदार यांना वारंवार मागण्या निकाली काढण्यासाठी भेटी घेऊन चर्चा केली व लिखित निवेदने दिली, परंतु मा. अधिकारी वर्गाने पटवा-यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन पटवारी संघाचे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पटवारी संघाचे अध्यक्ष प्रकाश सुर्वे, धनराज पारसे, संपत कन्नाके, दीपक गोहने, मनोज भोयर, यासह विदर्भ पटवारी संग नागपूर, जिल्हा शाखा चंद्रपूर येतील शेकडोपटवारी सहभागी झाले होते.
तसेच राजुरा येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्री. किशोर कुलकर यांचेवर गैर कायदेशीर मार्गाने विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.
अशा या आमच्या आर्थिक व सेवाविषयक मागण्या निकाली काढणे व गैर कायदेशीररीत्या लावण्यात आलेली विभागीय चौकशी रद्द करण्यात यावी याकरिता विदर्भ पटवारी संघ, चंद्रपूर च्या वतीने मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना यांना भेटून विनंती केली, परंतु आमच्या मागणी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे विदर्भ पटवारी संघ, चंद्रपूर जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब, चंद्रपूर यांना दिनांक २१/०३/२०२५ रोजी आंदोलनाची नोटीस दिली.
या आंदोलनाचे टप्पे
. दिनांक २४/०३/२०२५ ते २६/०३/२०२५ पर्यंत काळ्या फिती लावून कामे करणे.
हा टप्पा पार पडूनही आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे दिनांक २७/०३/२०२५ रोजी नाईलाजास्तव मा. जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर एक दिवसीय सामुहिक रजा आंदोलन करण्यात आले.
यानंतरही जर आमच्या आर्थिक व सेवाविषयक मागण्या निकाली निघाल्या नाहीत व श्री. किशोर कुलकर ग्राम महसूल अधिकारी पाटण तालुका जिवती यांचेवरील गैर कायदेशीर रित्या लावलेली विभागीय चौकशी रद्द करीत नाहीत तोपर्यंत दिनांक ०१/०४/२०२५ पासुन सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी बेमुदत सामुहिक रजा काम बंद आंदोलन आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी यांनी या माध्यमातून शासन प्रशासनाला इशारा दिला आहे.