जागतिक महिलादिनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या 24 महिलांना सन्मानित
महिला व बालकल्याण विभाग व पंचायत समिती बल्लारपूर द्वारे नावीन्यपूर्ण उपक्रम
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
दिनांक मार्च 12, 2025
आज दिनांक 11 मार्चला राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे हे भव्य प्रमाणात जागतिक महिला दिनाचे आयोजन महिला व बालकल्याण विभाग व पंचायत समिती बल्लारपूर द्वारे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शिक्षिका, साधनव्यक्ती, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, युवा प्रशिक्षणार्थी, पंचायत समिती स्तरीय सर्व महिला कर्मचारी, आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी यासह सर्व क्षेत्रातील महिला कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. अलकाताई आत्राम, माजी सभापती, पंचायत समिती पोम्भूर्णा व अध्यक्ष म्हणून मा. बुद्धलवार मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होत्या.अमित मेश्राम, बाल विकास प्रकल्प अधिकारी
डॉक्टर आशा साळवे, डॉक्टर कांबळे वैद्यkiy अधिकारी
एडवोकेट भाले मॅडम कल्पना देवगडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ शीला साळवे
प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
आजचा कार्यक्रम म्हणजे हा सामाजिक परिवर्तनाची नांदी होय. महिलांनी आत्मनिर्भर होणे काळाची गरज आहे. असे मत कार्यक्रमाचे उद्घाटक महोदया अलका आत्राम यांनी व्यक्त केले. त्यांच्या मनोगतच्या वेळी सभागृहात निरव शांतता होती. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदया माननीय बुदलवार मॅडम यांनी सुद्धा आपल्या भाषणातून महिलांना प्रेरणा दिली. इतरही मान्यवरांचे मनोगत एक नवी चालना देणारे होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अत्यंत सुरेख पद्धतीने महिला बालकल्याण विभाग बल्लारपूर व पंचायत समिती बल्लारपूर यांनी केले होते.
जागतीक महिला दिना निमित्य महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता गीत गायन, नृत्य, यासारखे उपक्रम राबविण्यात आले तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा करणाऱ्या 24 महिलांचे यावेळी सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दीप्ती जगझाप यांनी तर आभार प्रदर्शन अर्चना लोणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महिला व बालकल्याण विभाग व पंचायत समिती बल्लारपूर येथील कर्मचाऱ्यांनो मेहनत घेतली असून कार्यक्रमात यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.