शिवनीचोर येथील अवैध्य रेती तस्करी करणाऱ्या तीन ट्रॅक्टर वर कारवाई
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाच्या पथकाने आज सकाळी शिवनी चोर येतील अवैद्य रेती तस्करीत करणाऱ्या तीन रेती भरलेल्या ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई मा. तहसीलदार साहेब यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, ग्राम महसूल अधिकारी दिनेश काकडे, विशाल कोसनकर, अनुप वघारे, श्री आखरे, यांचे पथकांनी शिवणीचोर येथे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या 3 ट्रॅक्टर वर कारवाई करून वाहन तहसील कार्यालयात जमा केले. टाँक्टर नंबर
कपिल रमेश आवळे, MH -34 A-3756,
अभय सपाट MH-34 CD-4763,कुवरलाल तोताराम केवट MH-34 BR-8915, यांच्या मालकीची आहेत.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची उलाढाल सुरू आहे. सरकारने रेती घाटाचे लिलाव न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे सरकारने घरकुल सर्वसामान्यांसाठी रेतीचा बांधकामासाठी पुरवठा न होत असल्याने सर्वसामान्यांची ओरड होत आहे. तर दुसरीकडे शासनाने अवैध्य रेती तस्करी करणाऱ्या माफीयांवर लगाम कसणे सुरू केले असले तरी. रेती तस्करीतील मोठ्या माशावर कारवाई होताना दिसून येत नाही. महसूल प्रशासनाने केलेली कारवाई स्तुत्य असून अशाच प्रकारची कारवाई मोठ्या अवैद्य रेतीची उलाढाल करणाऱ्या तस्करांवर करावी.