आ. किशोर जोरगेवार यांची साखळी ठिया आंदोलनाला भेट, आरक्षण नोकर भरती गंभीर विषय
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या उपविधीमध्ये अनुसूचित समुदायांना आरक्षण देण्याचे नमूद असतांना बैंकेच्या नोकर भरतीत अनुसूचित समुदायांचे आरक्षण हटवून अन्याय केल्याने बैंक अध्यक्ष व संचालकांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट दाखल करून चुकीच्या एजन्सी मार्फत परीक्षा घेऊन कोट्यावधीचा भ्रष्टाचार होतं असल्याने ही नोकर भरती प्रक्रिया त्वरित थांबवून आरक्षणासह नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याबाबत.
या संदर्भात आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती द्वारे चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकने नोकर भरती मागासवर्गीय आरक्षण हटविल्याने त्या कोटावधी रुपयाचा भ्रष्टाचाराच्या विरोधात मागील दि.2/1/2025 पासून सीडीसी बँकेच्या समोर साखळी ठिय्या आंदोलन सुरू आहे.
चंद्रपूर विधानसभेचे आमदार श्री. मा. किशोर भाऊ जोरगेवार साहेब यांनी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या मंडपामध्ये भेट दिली
मध्यवर्ती सहकारी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण हटविल्याने होत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती द्वारा मागच्या अनेक दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलन स्थळी भेट देऊन. आंदोलन कर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. हा विषय गंभीर आहे. आपण नक्कीच या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असे यावेळी आमदार जोरगेवार साहेबांनी आंदोलन कर्त्यांना अश्वस्थ केले.