गणतंत्र दिनी पोलीस प्रशासनाकडून पत्रकारांची मुस्कटदाबी !




गणतंत्र दिनी पोलीस प्रशासनाकडून पत्रकारांची मुस्कटदाबी !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापनदिन सोहळा देशभर साजरा करीत सगळीकडे आनंद उत्सव बनवला जातो. चंद्रपूर येते पोलीस मुख्यालयातील ग्राउंडवर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण होत असताना. पोलीस मैदाना वर
वृत्तपत्र वाहिनीचे पत्रकार बातमीसाठी चित्रकरण करण्याकरिता गेले असता. तेथील समोर जाऊन चित्रीकरण करण्यास मज्जाव करून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना धक्का देऊन काढण्याचा प्रकार घडला.
पालकमंत्र्यांच्या पहिल्याच कार्यक्रमात पत्रकारांना अपमानीत करून पोलिस प्रशासनाने धक्का दिला. 
 तद्वतच सर्व चित्रीकरण करणारे पत्रकार बाहेर येऊन पोलिसांनी केलेल्या वर्तनाचा निषेध म्हणून चित्रीकरण सोडून बाहेर आले. अशा घटना पोलीस प्रशासनाकडून वारंवार होत असल्याने पत्रकारांनी बातम्या करायच्या कशा असा प्रश्न आता पत्रकारासमोर उभा राहिला आहे.
ही घटना माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना सांगितली. या घटनेची माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांना देऊन संबंधित पालकमंत्री यांना भेटण्याची वेळ घेऊन तसेच जिल्हाधिकारी यांना सर्व घटने संदर्भात माहिती देऊन घटना कथन केली.
असे प्रकार वारंवार घडत असल्याने पत्रकारा कडून पोलीस प्रशासनाचा निषेधच करण्यात आला. माध्यमांना आपण चौथा स्तंभ समजला जातो. एकीकडे देशात 75 वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि पत्रकाराच्या स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्याचा प्रयत्न म्हणजेच पत्रकारांची एकंदरीत मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर करण्यात आला. आतापर्यंतच्या पोलीस मुख्यालय पोलीस मैदानावर कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची अवहेलना झालेली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी यापुढे असे होता कामा नये. आपण समजून घ्यावे. अशी भावना व्यक्त केली.
पत्रकारांना बातमीपासून रोखण्यापेक्षा चंद्रपुरातील बिघडलेली सुव्यवस्था , वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यावर जास्त पोलिसांनी भर दिला तर जास्त बरे होईल. अशी प्रतिक्रिया ही आता चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकाकडून होत आहे. पोलीस प्रशासन आणि पत्रकार हा समाजातील दुवा असून जनसामान्याच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करीत असतात.