अजयपुर ठेमना-जांभरला येथे कोंबड बाजारात लाखोंची उलाढाल !



अजयपुर ठेमना-जांभरला येथे कोंबड बाजारात लाखोंची उलाढाल !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर असलेल्या अजयपुर जंगलात वन कंपार्टमेंट असलेल्या ठेमना- जांबरला या गावालगत असलेल्या तलावाजवळ वन विभागाच्या हद्दीत मागील दोन महिन्यापासून दर रविवारी कोंबड बाजारात लाखोची उलाढाल होत आहे. आठवड्यातून या परिसरात दोन दिवस मोठ्या प्रमाणात कोंबड बाजार भरविला जात आहे. या कोंबड बाजाराला वन व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन, यांची कृपादृष्टी असून यापूर्वी सूत्राच्या माहितीनुसार या कोंबड बाजारावर पोलिसांकडून धाड पाडली होती. परंतु त्या कारवाईचे काय झाले? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. येथील पूर्वी रेती तस्कर करणारा आणि आज कोंबड बाजार चालवणारा किंग कोण याची चर्चा या परिसरात होत आहे.
या कोंबड बाजारात मोठ्या प्रमाणात झेंड्या मुंड्या, सट्टा पट्टी, जुगार खेळल्या जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोंबड बाजार
चालवण्यासाठी
वनविभाग, वन व्यवस्थापन समिती व पोलीस विभागाला  कोंबड्याची परवरी मिळत असते. एवढेच नाही तर हप्ते खोरीच्या मोमायात हे सर्रास सुरू असल्याची चर्चा या परिसरात होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने घेऊन गोर गरीबाच्या खिशाला लागणारी कात्री   कोंबड्याचे  जीव घेणा प्रकार थांबवून संबंधित कोंबडा बाजार किंग ला आळा घालावा अशी या परिसरातील शुज्ञ नागरिकांची मागणी आहे.