विचोडा, रयतवारी इरईनदीच्या उगमस्थान असलेल्या नदीपात्रातून रेतीची तस्करी !



विचोडा, रयतवारी इरईनदीच्या उगमस्थान असलेल्या नदीपात्रातून रेतीची तस्करी !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील चंद्रपूरकरांसाठी जलवाहिनी असलेल्या इरई नदी पात्रातून रोज रात्री रेतीची तस्करी होत असून
या पात्रातून बालाच्या जेसीबीने रात्रीचा खेळ खंडोबा सुरू असून या रेती तस्करी कडे अजूनही महसूल विभागाचे चाके फिरकलेली दिसून येत नाहीत. अनेकदा महसूल विभागांना या रेती तस्करीची माहिती असताना सुद्धा कुणाच्या आशीर्वादाने या रेती तस्करांना अभय मिळत आहे. हे मात्र सर्वसामान्य नागरिकांना आता सांगण्याची काही गरज राहिलेली नाही. अशी चर्चा या परिसरातील नागरिकात होत आहे. रोज रात्रीचा खेळ सुरू असून लाखो रुपयाचा शासनाचा महसूल हे रेती तस्कर आपल्या घशात घालत आहेत. छोट्या नागपूर पासून सुरुवात झालेल्या इरेनदीच्या पात्रातून रेती तस्करी विचोडा   बुज, रयतवारी या गावात असलेल्या नदीपात्रातून तीन किलोमीटर  अंतर असलेल्या  कोसारा आणि  आसपासच्या गावातील रेती तस्कर बाल्याच्या जेसीबीने रोज रात्री  रेतीचा उपसा करून चोरटे  पाईप  लाईनच्या मार्गाने  रेतीची तस्करी करीत असतात. या नदीपात्रात होत असलेल्या रेती उपसा करणाऱ्या रेती तस्करांवर महसूल विभागाने कारवाई करून वन परिसरात असलेल्या या नदीला   पर्यावरणापासून वाचवावे  व संबंधित तस्करांवर कठोर कारवाई करावी  अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.