चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील व्यवस्था खिळखिळी ! फक्त गुरुवारीच भेटतात अधिष्ठाता अभ्यंगताना...! chandrapur medical college




चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील व्यवस्था खिळखिळी !

फक्त गुरुवारीच भेटतात अधिष्ठाता अभ्यंगताना...!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुख सुविधा उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आधुनिक दृष्टिकोनाचा विचार करून सर्वसामान्यांना रुग्ण सेवा घेता यावे या दृष्टीकोनातून, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपुरात भव्य दिव्य अशा स्वरूपात निर्माण केले. मात्र या जिल्हा रुग्णालयाची व्यवस्था अजूनही खिळखिळी बनली आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. त्यात अनेक विद्यार्थी डॉक्टरेट घेऊन सेवाही देत आहेत. परंतु या शिकाऊ डॉक्टरांच्या हातातूनच जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांची मलमपट्टी करून घेतली जात आहे. अनुभवी डॉक्टर फक्त सरकारी तिजोरीच्या तणख्यासाठी असतात का? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. ओटीपी वर, प्रत्येक आरोग्य विभागाच्या व्यवस्थिते साठी  एक अनुभवी डॉक्टर,   परिचारिका असावी लागतात. परंतु या ठिकाणी  नवशिक्या डॉक्टरांकडून सर्व  रुग्णांचे उपचार केल्या जातात. कालच झालेल्या एका अपघातासाठी शिकाऊ डॉक्टरांकडून त्यांची ट्रीटमेंट केल्या गेली. परंतु त्या ठिकाणी आर्थो डॉक्टर उपस्थितच नव्हते. दोन तासानंतर   आर्थो  डॉक्टर उपस्थित झाले. ते पण नऊ सीकेच होते. अशी रामभरोसे सामान्य रुग्णालयाची परिस्थिती आहे. थातूरमातूर एक्स-रे पाहून बाहेरून औषध आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली . जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधी  तुटवळा असून  अनेक रुग्णांना बाहेर येऊन औषधी विकत घ्यावे लागत आहे. या रुग्णालयात अनेक दिवसापासून सिटी कॅन मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणाचा त्रास सहन करावा लागत आहे. या सेवेसाठी गरजू रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाहीत. एवढेच नाही तर शासकीय सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी सोनोग्राफी सेवा उपलब्ध नसते. तातडीने येणाऱ्या रुग्णांसाठी फार मोठी अडचण निर्माण होत आहे. गंभीर समस्येमुळे  इथे येणारे  रुग्णालचे आप्तसकीय  खाजगी डॉक्टरांचा दवाखाना  नाही लाजस्तव  शोधण्याच्या तयारीत असतात. येथे सेवार्थात असलेल्या अनेक डॉक्टरांची खाजगी दवाखाने असून त्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
   हे रुग्णालय खाजगीकरण झाले तेव्हापासून  विविध समस्याचे माहेरघर झाले असून. या ठिकाणी लावण्यात आलेली  सेक्युरिटी  ही  सर्वसामान्य नागरिकांनाही डोकेदुखी ठरत आहे.    सुरक्षा दलाचे सेक्युरिटी  नागरिकांच्या नातेवाईकासोबत असभ्य वर्तणुकीत  हुज्जत घालित असतात. एकीकडे सुव्यवस्था व्हावी म्हणून अशा सेक्रुटींची व्यवस्था केली असता  सेक्युरिटी मात्र  माध्यमाचे प्रतिनिधी  , एखादा समाजसेवक असो, किंवा राजकीय नेते असो यांच्यासोबत सुद्धा गैरवर्तुनी  केल्यासारखे वागतात. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आवर  घालावी.
 येथील अधिष्ठता हे फक्त गुरुवारीच अभ्यंगताना  भेटतात.
 त्यामुळे  रुग्णांच्या नातेवाईकांना  काही समस्या राहिल्यास   कुठे मांडायच्याअसा प्रश्न निर्माण होतो. आठवड्यातून एकदा अधिष्ठाता या रुग्णालयात भेटण्यासाठी फक्त दोन तास देतात. यावरून   रुग्णालयाची  दयनीय  व्यवस्था  दिसून येते .
  जिल्हा सामान्य रुग्णालयात होत असलेल्या खिळखिळी व्यवस्थेवर  उपायोजना करून  सर्वसामान्य  रुग्णांना सुख सुविधा निर्माण करून द्याव्या.
 तसेच जिल्हाचे पालकमंत्री, आमदार यांनी या गंभीर  समस्या कडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी  जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत.