शेतकऱ्याला विषारी सापाने केला दंश, रुग्णालयात भरती
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर तालुक्यात येत असलेल्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चेक निंबाळा या गावातील शेतकरी
रवींद्र मार्कांडी मडावी वय 42 याला काल दुपारी 3 वाजताच्या दरम्यान शेतात काम करत असताना विषारी सापाने सर्पदंश केला. त्याच्या शेतात लागून असलेल्या एका शेतकऱ्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, त्याला आयसीयू मध्ये भरती करण्यात आली असल्याची माहिती त्याच्याआप्त सखीयानी आणि दिली.