...या खरेदी- विक्रीचा 14 ला चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य शुभारंभ
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती रामनगर येथे दिनांक 14 /12 /2024 ला रोज शनिवारीला "बकरा- बकरी, शेळी -मेंढी" खरेदी विक्रीच्या बाजाराचा भव्य शुभारंभ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व जवळपास लागून असलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी व व्यापारी बांधवांना
कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर रामनगर मार्केट यार्डचे
भव्य प्रांगणात शेतकरी हितार्थ खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायाच्या करिता आठवड्यातून दर शनिवारला सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मुख्य बाजार स्थळावर प्रत्यक्ष व पारदर्शक खरेदी विक्रीचा व्यवहार होईल. सर्व शेतकरी, व्यापारी व इतर संबंधितांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन बाजार समितीचे मुख्य बाजार स्थळावर बकरा- बकरी, शेळी व मेंढी विक्रीस आणावे असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य,उपसभापती
सुनील फरकाडे, सचिव संजय पावडे, पारस पिंपळकर, सुभाष पिंपळसेंडे, दयानंद बक्कुवाले,अणिल मोरे, दिनेश चोखारे, व समस्त संचालक मंडळ यांनी या भव्य शुभारंभास समस्त शेतकरी व व्यापारी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.