चंद्रपूरात सीएसटीपीएसचा राखेचा प्रादुर्भाव, प्रदूषण विभागाची भूमिका भुंकणाऱ्या कुत्र्यासारखी ! cstps chandrapur





चंद्रपूरात सीएसटीपीएसचा राखेचा प्रादुर्भाव, प्रदूषण विभागाची भूमिका भुंकणाऱ्या कुत्र्यासारखी !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात मागील दोन महिन्यापासून चंद्रपूर थर्मल पॉवरच्या सीएसटीपी एच च्या ऊर्जानगर पावर प्लांट मधून
मागील दोन महिन्यापासून चंद्रपूर शहराच्या परिसरात राखेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. ही राख अक्षरशा
गाड्यांवर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे.
एकट्या चंद्रपुरातील सीएसटीपी एस च्या पावर प्लांट मधून 20,000 mwt विद्युत निर्माण केली जाते. ती पश्चिम महाराष्ट्रात पाठवली जाते. ते चंद्रपूरकरांचे रक्त शोषून घेतो. स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात बिमाऱ्याचे प्रमाण वाढले असून या धुडीमुळे अनेक आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. खास करून हार्ट अटॅक, श्वसनाचे आजार,  बालवयापासूनच या आजाराची लागत होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
  ही राख  मोठ्या प्रमाणात पडत असताना अधिकारी मात्र उघड्या डोळ्यांनी पाहून जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. अक्षरशः ही राख गाडीच्या काचावर जमा होताना दिसत आहे. तर परिसरात घरांवर एवढेच नाही तर घरांच्या खिडकीतून  आत मध्ये घुसली जात  असून नाकात, तोंडात  लंग्स मध्ये  जात असल्याने नागरिकाना अनेक आजारांना समोर जावं लागत आहे .
 महाराष्ट्रातील कार्पोरेट पावर  आणि महाजनको पावर प्लांट यांच्यात महाराष्ट्रात उत्पन्न होणाऱ्या वीज उत्पन्नाची विचार केला तर सर्वाधिक वीज 28 हजार mw जी महाराष्ट्रात वीज उत्पादन होत असताना. एकट्या चंद्रपूर आतून वीस हजार मीगावॅट विद्युत तयार होत असतो. उर्वरित वीज ही बाकी जिल्ह्यात तयार होतो. याचा सर्वाधिक फटका चंद्रपुरातील जनतेवर बसत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भुंकणाऱ्या कुत्र्यासारखे झाले आहेत. ते फक्त भुंकू शकतात, मात्र  चाऊ शकत नाही! एकंदरीत हे सर्व होत असताना प्रदूषण नियंत्रण  मंडळ उघड्या डोळ्यांनी पाहत असून एकंदरी यांची मुखसंमती असतोच! असे म्हणावे लागेल. त्याचे असे झाले आहे की, रोज मरे ,त्याला कोण रडे!  अशी या विभागाची परिस्थिती झाली असून चंद्रपूरकरानाही याची सवय झाली आहे. कारण येथील लोकप्रतिनिधी, यांची दुकानदारी या पावर प्लांट वर अवलंबून आहे. त्यामुळे हा कारखाना ही बंद करू शकत नाहीत.  कारण लोकप्रतिनिधींच्या, आणि त्यांच्या भाडोत्री  ठेकेदारांच्या दुकानदाऱ्या  या कंपनीवर अवलंबून आहेत. त्यामुळे इथला कुठलाही लोकप्रतिनिधी  यांना यासी काही देणे घेणे नाहीत. अपना काम जमता! भाड मे जाये जनता! अशा प्रकारची स्थिती सध्या चंद्रपूरकरांची झाली आहे. आणि पर्यावरणवादी  संस्था ही सध्या मुंग गिळून गप्प बसले आहेत. याच कारणाने, चंद्रपुरातील अनेक नागरिकांनी आपले बस्तान नागपूर सारख्या शहरात मांडण्याचे  उदाहरणे समोर येत आहेत. पुन्हा काही वर्ष अशीच परिस्थिती या पावर प्लांट ची राहिली तर, चंद्रपुरातील प्रत्येक घरामध्ये धुरंदर आजाराचा एक  रुग्ण सापडला तर वाईट म्हणाला नको!