... या भाजप नेत्याच्या 'दिवाळी मिलन' सोहळ्यात 'भाऊंना निमंत्रण नव्हते !



... या भाजप नेत्याच्या 'दिवाळी मिलन' सोहळ्यात 'भाऊंना निमंत्रण नव्हते !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरातील अनेक पक्ष दल बदलू करून राष्ट्रवादीतून भाजपात स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी आलेल्या स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या आवारात दिवाळी सणानिमित्त, दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले होते. या स्नेह मिलन सोहळ्यात चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. सोहळ्यात भाजप नेते माजी मंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. चेतन खुटेमाटे, माजी नगराध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोटुवार, काँग्रेस सेवादल अध्यक्ष नंदू खनके, अनिल शिंदे, विजय राऊत, संभाजी ब्रिगेडचे दिलिप चौधरी यांसह भाजपतील अहीर समर्थक आणि कुणबी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. मात्र सुधीर मुनगंटीवार यांचे सह त्यांचे कार्यकर्ते उपस्थित नव्हते. त्यामुळे या राजकीय स्नेह मिलन सोहळ्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
काँग्रेसच्या काही समाजातील लोकांना आमंत्रित केले होते. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना बोलवण्याची गरज नाही, ते मित्र आहेत! त्यांना निमंत्रणाची गरज नाही! ते कधीही येऊ शकतात. अशा प्रकारचे बोलून एकंदरीत ज्येष्ठ नेते हे राजकीय जवळीक मित्र असल्याचे बोलले !   यावरून असे दिसून येते की भाऊंना ओबीसी नेत्यांनी हेतू पुरस्कार डावलले का?
पण चंद्रपूरची जनता सर्व उघड्या डोळ्यांनी पाहते. स्वार्थाच्या विचार करण्याची अशोकांची नेहमी सवय झाली आहे. त्यामुळे या दिवाळी मिलन सोहळा हा शिक्षण मंडळाच्या अमृत  महोत्सवाच्या
वर्षाच्या वाटचालीकरीता  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असावे?  अशी ही चर्चा होत आहे.
लोकसभा निवडणुकीपासून कुणबी समाज हा भाजपापासून दूरावला आहे. विधानसभा निवडणुकीत ही नाराजी दूर व्हावी  या हेतूने राजकीय  पक्षातील कुणबी समाजांना   एकत्र आणण्याचा हा दिवाळी मिलन सोहळ्याचा कार्यक्रम असला तरी !  काँग्रेसच्या नेते, आणि उमेदवार  कार्यक्रम स्थळी आले तोपर्यंत भाजपाचे नेते तथा उपस्थित लोकांची गर्दी या कार्यक्रमातून मावळली होती. 
पक्ष दल बदलू करताना मोठी अपेक्षा होती की, भाजपा लोकसभा उमेदवारी देईल पण तिथे ही निराशा पदरी पडली! . विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वरोरा क्षेत्रातून मिळेल अशी अपेक्षा होती. पण....!