मनसेचे मनदीप रोडे यांच्या उमेदवारीची 'माशी'कुठे शिंकली !



मनसेचे मनदीप रोडे यांच्या उमेदवारीची 'माशी'कुठे शिंकली !


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्राच्या विधानसभेचे वारे वाहू लागताच. अनेक उमेदवारांनी आपल्या आरक्षण क्षेत्रामध्ये उमेदवारी मिळावे म्हणून धावपळ केली. त्यात चंद्रपूर विधानसभेत क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी उमेदवार म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांना सर्वप्रथम मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी चंद्रपुरातील महामेळाव्यात घोषणा करून जाहीर केले. याच मेळाव्यात चंद्रपुर जिल्ह्यातील मनसेच्या दोन गटातील कार्यकर्त्यात उमेदवारीच्या वाटपावरून राळा ही झाला होता.
सर्वात प्रथम चंद्रपूर आणि राजुरा क्षेत्रातील मनसेच्या दोन उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली होती. चंद्रपूर मधून मनदीप रोडे तर राजुरा विधानसभा क्षेत्रातून सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती.
तसे त्याप्रमाणे मनदिप रोडे हे आपले कार्यकर्त्यांना घेऊन विधान परिषदेच्या क्षेत्रात कामाला लागले होते. त्यांनी आपले वचन नाम्यातील  पाँम्लेट सुद्धा जनतेसमोर आणले  होते. त्यांचा   हजारोच्या संख्येने  कार्यकर्ता मेळावा  आयोजित करून  त्या मेळाव्यात हजारो मनसे सैनिकांना भोजनाची मेजवानी ही दिली. सर्व सुरू असताना अचानक उमेदवारी अर्ज 'नामांकन' दाखल न झाल्याने नेमकी 'माशी' कुठे शिंकली ! हे मात्र जनतेला गुलदस्त्यात ठेवण्यासारखे झाले. 
  यामुळे   मनसेच्या उमेदवारीवर  विविध प्रक्रिया उमटत आहेत.  याबाबत मनसे चे उमेदवार मनदिप रोडे यांनी आतापर्यंत कुठलेही ना पत्रकार परिषद घेतली, ना  जनतेला असलेला संभ्रम दूर केला?  सर्वप्रथम मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी चंद्रपूरची उमेदवारी जाहीर केली. त्याच उमेदवाराने कालांतराने नामांकन न दाखल केल्याने सध्या चंद्रपूर शहरात याबाबत अनेक चर्चांना  पेव फुटले आहे.  
याबाबत मनदिप रोडे यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता.  त्यांनी कुठलाही  प्रतिसाद दिला नाही.
मात्र ते कोळे अजूनही उघडले नसल्याने. त्या उमेदवारीचे नेमके झाले काय? हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे?