जिल्ह्यातील जोरगेवार, मुनगंटीवार, वडेट्टीवार, चटप, वारजूरकर, देवतळे होणार आमदार ?
दिनचर्या न्युज -
चंद्रपूर :-राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान काल आटोपले चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील 94 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहेत. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराची नसीब 23 तारखेला उघडणार आहेत. लोकशाहीमध्ये निवडणूक हा मोठा उत्सव .
या मतदान प्रक्रियेत सरासरी जिल्ह्यात 75 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान चिमूर विधानसभा क्षेत्रात झाले असून दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तत्पूर्वी राजकीय विश्लेषक सर्वेतून चंद्रपुर किशोर जोरगेवार, बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार, ब्रह्मपुरी विजय वडेट्टीवार, राजुरा वामनराव चटप, चिमूर सतीश वारजूरकर, वरोरा करण देवतळे हे आमदार होणार आहेत ?
चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झाले असून खरी लढत भाजपचे किशोर जोरगेवार आणि काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांच्यात आहे. दोन्ही राजकीय पक्षाच्या बंडखोरीत मत अपक्ष उमेदवार ब्रिजभूषण पाझारे, राजू झोडे यांच्यात वाटले जाणार आहेत. त्याचा जास्त फायदा हा किशोर जोरगेवारांना होत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जोरगेवार हे निवडून येण्याची दाट शक्यता नाकारली जात नाही अशी चर्चा होत आहे.
भाजपचे जिल्ह्यातील पालकमंत्री असणारे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार त्यांची लढत काँग्रेस पक्षाने तिकीट न दिल्याने अपक्ष लढत असलेल्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्याशी थेट होत असल्याने काँग्रेसचे उमेदवार संतोष सिंग रावत यांच्यात थोडा बहुत मत विभाजन होत असल्याने थेट फायदा भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना होत असून निसटता पराभवातून सुधीर मुनगंटीवार विजय होणार आहेत. काँग्रेसचे रावत हे तिसऱ्या नंबर वर जात असल्याचे संकेत बल्लारपूर क्षेत्रात दिसून येत आहे. मात्र
डा. अभिलाषा गावतुरे यांची सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काट्याची लढत होत आहे. यात सुधीर मुनगंटीवार बाजी मारणार असल्याचे चित्र स्पष्ट होणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपले प्राबल्य ,वर्चस्व टिकवून ठेवणारे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार
राजकारणात आल्यापासून कधीही पराजय न बघणारे व विपरीत परिस्थितीत सुद्धा आपला विजयी रथ पुढे नेणारे विजय वडेट्टीवार हे यावेळी सुद्धा निवडून येतील असा अंदाज ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात वर्तवल्या जात आहे .
विजय वडेट्टीवार यांचा विजयी रथ भाजप उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णलाल सहारे हे अडवू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. ही एकतर्फी विजयश्री होत असल्याचे चित्र या क्षेत्रात आहे.
जिल्ह्यात झालेले मतदान टक्केवारीत असे आहे, राजुरा -72.71 चंद्रपूर – 57.98, बल्लारपूर -69.70 ब्रम्हपुरी -80.54, चिमूर -81.75, वरोरा -69.48, यावरून कोण कुठे प्रभावी आहेत हे कळत नसलं तरी ज्यावेळी मतदान जास्त होत असतें तेंव्हा परिवर्तन ठरलं असतें यावरून ब्रम्हपुरी व चिमूर मध्ये काट्याची टक्कर आहे.
चिमूर येथे झालेले रेकॉर्डब्रेक मतदान हे भाजप उमेदवार बंटी भांगाडिया यांना धोक्याची घंटा असून कांग्रेस चे अविनाश वाजूरकर हे येथे निवडून येईल अशी शक्यता आहे, चिमूर विधानसभा क्षेत्रातील परंपरा ही एखादा उमेदवाराला एकदाच निवडून देण्याची असताना सुद्धा बंटी
भां भांगडियागडीया यांना दोनदा जनाधार मिळाला. परंतु या वेळेस रेकॉर्ड तोड मतदान झाल्याने भांगडीयाची
घंटी वाजत असल्याचे स्पष्ट संकेत चिमूर विधानसभा क्षेत्रात दिसुन येत असून त्यात डॉक्टर सतीश वारजूकर यांचा विजय होत असल्याचे चित्र आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात सुद्धा आदिवासी दुर्गम भाग असतांना 72.71 टक्के मतदान झाले, मात्र या क्षेत्रात चौरंगी लढत होतांना दिसत आहे यामध्ये कांग्रेस सुभाष धोटे व तिसऱ्या आघाडीचे उमेदवार वामनराव चटप यांच्यात जोरदार लढत होतांना दिसत आहे, मागील निवडणुकीत अगदी 17 व्या फेरीपर्यंत पुढे असणारे वामनराव चटप यांचा 2000 हजार मतांनी सुभाष धोटे यांनी पराभव केला होता, मात्र आता वामनराव चटप अशाच अटीतटीत 2 ते 3 हजार मतांनी निवडून येतील असा अंदाज आहे.
वरोरा विधानसभा मतदार संघात पंचरंगी होणारी निवडणूक सरतेशेवटी तिरंगी लढतीत परवार्तीत झाली, त्यात भाजप उमेदवार करण देवतळे यांनी आघाडी घेतली तर अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांनी जोरदार लढत दिली, मात्र कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या सोबत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मोठी ताकत ऐन शेवटच्या दोन दिवसात व मतदानाच्या शेवटच्या तासापर्यंत लावल्याने मुकेश जीवतोडे यांना फटका बसलेला आहे दरम्यान भाजप उमेदवार करण देवतळे हे येथे निवडून येण्याची शक्यता वाढली आहे.
असा हा आमच्या माध्यमातून एक्झिट पोल असून हे भाकीत आणि नागरिकांचा अंदाजानुसार हे उमेदवार भावी आमदार होत असल्याचे संकेत सामोरे येत आहेत?