..या तारखेला आदिवासी हक्क संघर्ष समितीचा लाखोंचा आक्रोश मोर्चा




..या तारखेला आदिवासी हक्क संघर्ष समितीचा लाखोंचा आक्रोश मोर्चा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी सोमवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2024 ला सकाळी 11 वाजता शहीद भूमी बाबुराव पुरेश्वर शेडमाके स्मारका पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आदिवासी हक्क संघर्ष कृती समिती द्वारा विविध मागण्या घेऊन लाखोंच्या संख्येत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासीचे मूलभूत प्रश्न- जीवन मरणाचे अजूनही सुटलेले नाही. आदिवासीचे संविधानिक अधिकार व पायाभूत हक्क बाधित करण्यासाठी असंविधानिक पद्धतीने डावपेच आखले जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदिवासीच्या एकाही आमदाराला विश्वासात न घेता आपली राजकीय पोळी शेकून घेण्यासाठी इतर जातीचा अनुसूचित जमातीत आदिवासीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू नये . अशा इतर प्रमुख मागण्या घेऊन चंद्रपुरातील लाखो आदिवासी आपल्या संविधानिक अधिकारासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. अशी माहिती आज श्रमिक पत्रकार परिषदेत प्रमोद बोरीकर, बापूजी मडावी, कृष्णा मसराम, जितेश कुळमेथे, प्रदीप गेडाम, जितू मडावी, नामदेव शेडमाके, विराज सुरपाम, महिपाल मडावी, विठ्ठल कुंबरे, यास अनेक आदिवासी हक्क संघर्ष समितीचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. त्यांनी या विशाल आक्रोश मोर्चा समाजातील विविध क्षेत्रातील शेतकरी, कामगार, तरुण-तरुणी, प्राध्यापक,इंजी. शिक्षक व समाजातील बुद्धिजीवी वर्गाने बहुसंख्येने उपस्थित राहून होणाऱ्या आपल्या शेवटच्या न्यायीक हक्कासाठी विशाल मोर्चात सामील व्हायचे आव्हान केले आहे.