'त्या ' आजी-माजी खासदार, नेत्यांनी 'अम्माच्या' शोकसंदेशापासून घेतली फारकत !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री 'अम्मा' गंगुबाई जोरगेवार यांचे 20 ऑक्टोबरला सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या राहते घरी निधन झाले. ही वार्ता संपूर्ण जिल्हासह महाराष्ट्रभर पसरली. सर्वीकडून दुःखद घटना असल्याने जोरगेवार परिवारांना सर्वांचे शोक संदेश येत होते. त्यांची अंतिम यात्रा 21 डिसेंबरला शांती धाम वर निघाली. त्यात हजारो लोकांनी अंतिम निरोप देण्यासाठी एकवटले होते. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या. काही नेत्यांनी अंतिम संस्कारासाठी उपस्थिती झाले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील खासदार प्रतिभा धानोरकर, माजी खासदार नरेश बाबू पुगलीया, आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार किशोर जोरगेवार यांना अम्माच्या निधनाची साधी विचारपूसही केली नसून, त्या दुखवट्यात शोक संदेशाचा साधा संदेशही देता आला नसल्याची समशानभूमीपासून तर संपूर्ण चंद्रपूर शहरात चर्चा होत आहे. त्यामुळे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून अशा दुखवट्यात राजकीय लोकप्रतिनिधीने एखाद्या राजकीय लोकप्रतिनिधीला सांत्वन पर कुटुंबाप्रती आधार देऊन, या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करीत असतात. परंतु इथे राजकीय भेदभाव समोर असल्यामुळे अशा दुःखवट्यातही आजी-माजी खासदार आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानी यापासून फारकत केल्याची चर्चा होत आहे.