माजी सभापती कृष्णा राऊत यांचेसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश
.. या तालुक्यात भाजपला खिंडार - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक बांधिलकी, सर्व समाजाला न्याय देण्याहेतू सुरु असलेले अथक प्रयत्न, सामान्यांप्रती असलेली आपुलकी, सामान्य कार्यकर्त्यांची जाण, व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा झंजावत तसेच भोई समाजाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत हजारोंच्या संख्येने मिळवून दिलेले घरकुले अशा विविध कार्यामुळे प्रेरित होऊन भाजपाचे सावली पंचायत समिती माजी सभापती तथा भोई समाज नेते कृष्णा राऊत यांचे सह भाजयुमो आदिवासीं सेल तालुका अध्यक्ष रुपेश दडमल व शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यात हजारोंच्या संख्येने असलेल्या भोई समाज बांधवांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घरकुल मिळवून दिले. तसेच सर्व समाजाप्रती त्यांची आदर भावना, सावली तालुक्यांतील शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय, मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विवीध विकासकामे, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा विविध कार्यातून त्यांनी तालुक्यातील जनतेची मने जिंकली आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सर्वसमावेशक सामाजिक, राजकीय व विकासात्मक दूरदृष्टीकोण तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची जाण असणारा नेता म्हणून या सामाजिक भावनांनी प्रेरित होवून भाजपाचे सावली तालुक्यातील माजी पंचायत समिती सभापती कृष्णा राऊत यांचे सह भाजयुमो आदिवासीं सेल तालुका अध्यक्ष रुपेश दडमल व शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी व सावली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आयोजित प्रवेशाप्रसंगी मार्गदर्शन पर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी सामन्यातून आलो असल्याने मला सामान्य कार्यकर्त्यांची जाण आहे. मला प्रत्येक समाजाला समान न्याय देणे , त्यांचा हक्क मिळवून देण्याची शक्ती हि तुमच्या कडूनच मिळाली आहे. तुमच्या या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कुचंबना होत असून आजवर आमच्या भोई समाजाला कुठलाही न्याय देण्यात आला नसल्याने भाजपाला रामराम ठोकत असल्याचे मत माजी पंचायत समिती सभापती कृष्णा राऊत यांनी व्यक्त केले. यानंतर सावली तालुक्यातील उसेगाव, विहीरगाव, कोंडेखल ,उसरपार चक ,आकापूर (करोली) उपरी, पेंढरी (म.), बोथली, साखरी, जिबगाव येथील कार्यकर्त्यांचा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात प्रवेश स्वीकारत स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा मच्छीमार संघटनेचे तज्ञ गुलाब गेडाम यांनी केले. आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी सावली नगरपंचायत उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, प्रशांत राईंचवार, सभापति प्रीतम गेडाम, सीमा संतोषवार, प्रियंका रामटेके,नगरसेवक नितेश रस्से, गुणवंत सुरमवार, ज्योती गेडाम, ज्योती शिंदे, साधना वाढई, अंजली देवगडे, चंद्रकांत संतोषवार, आकाश खोब्रागडे, निखिल दुधे, मिथुन गणवीर, गब्बर दुधे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.