भाजपा चे देवराव भोंगळे याचा विस उमेदवारी अर्ज खारिज करा - पत्रकार परिषदेतून केली....!



भाजपा चे देवराव भोंगळे याचा विस उमेदवारी अर्ज 
खारिज करा - पत्रकार परिषदेतून केली....! 

राजुरा विस उमेदवार भाजपा चे देवराव भोंगले च्या चारही अर्जात त्रुटी

अर्ज पात्र नसल्याने त्वरित खारिज करावा 

पत्रपरिषदेत सूरज ठाकरे आणि उमेदवार भूषण फुसे यांची मागणी

दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर ब्युरो.:- 
70 राजुरा विधानसभा मतदार संघाअंतर्गत भाजपच्या वतीने उमेदवारी दाखल केलेले भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांच्या चारही अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. यासंदर्भात राजुरा विधानसभा उमेदवार भूषण फूसे आणि सूरज ठाकरे यांनी भोंगळे यांनी अर्जांमध्ये काही महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवल्याने हे चारही अर्ज तातडीने फेटाळण्याची मागणी पत्रकार परीषदेत केली आहे. 
भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने दिलेल्या माहितीचा तपशील मांडला. चारही उमेदवारी अर्जात टाकलेली माहिती चुकीची आणि आक्षेपार्ह आहे. त्यामुळे ठाकरे आणि फुसे यांनी भोंगळे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याची माहिती दिली. नियमानुसार 2022 पर्यंत सरकारी थकबाकी किती आहे याची माहिती भोंगळे यांना द्यायची होती. पण ती दिली नाही. 2001_05 मध्ये भोंगळे घुग्घुस ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यावेळी शासकीय लेखापरीक्षण केले असता भोंगळे यांच्याकडे सन 2001_2002 मध्ये 4 लाख 62 हजार 593 रुपये, 2002_2003 मध्ये 4 लाख 77 हजार 50 रुपये, 2003_2004 साली 4 लाख 78 हजार 832 रुपये, वर्ष 2004_2005 मध्ये 6 लाख 86 हजार 491 रूपए भोंगळे यांचेकडे शेष आहे. ही रक्कम भोंगळे यांचेकडून वसूल करण्याचे आदेश शासकिय आडिट मध्ये नोंदविले आहे. परंतु सादर केलेल्या चार उमेदवारी अर्जांमध्ये याबाबत कोणतेही स्पष्टीकरण किंवा खुलासा झालेला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याची मागणी सूरज ठाकरे आणि उमेदवार भूषण फुसे यांनी केली आहे. यासंदर्भ में मुंबई उच्च न्यायालयांच्या  नागपुर खंडपीठ मधे केस दाखल करण्याची माहीती दिली.   
पत्रकार परिषदेत डा. दिलीप चौधरी, भूषण फुसे, सुरज ठाकरे, रामदास चौधरी, गोमती पाचभाई उपस्थित होते.