आमदार, मी रुबाब दाखवणार...? लागले निवडणूकीचे...!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेकाची भाऊ गर्दी, लगीन घाई सुरू झाली आहे. काही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी उमेदवारांना हिरवी झेंडी दिली मिळाली. तर काहींना कामाला लागा असा पक्षाचा लालीपाप मिळाला आहे.त्या मुळे या निवडणुकीत हवंसे, गवसे- नवसे यांना मीच भावी आमदार होण्याचे डोहाळे लागले आहेत.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असून यासाठी राजकीय पक्षाच्या वरिष्ठांकडे उमेदवारी मिळावी म्हणून ससेमिरा सुरू झाला आहे. तर काही राजकीय पक्षांची तिकीट मिळाली नाही तर अपक्ष म्हणून लढण्याचा मनसोबा ठेवला आहे. यात राजकीय पक्षाच्या उमेदवाराला हिरवी झेंडी मिळाली आहे .
त्यात आपला वचननामा जनतेसमोर ठेवला आणि मी हे करून दाखवणारच...?....
आणि ते आतापर्यंत सर्वच राजकीय नेत्याच्या पुढाऱ्यांनी करून दाखवणारच... असा निर्धारच यापूर्वी केला गेला. पण सर्व 'येरे माझ्या मागल्या'! असेच झाले.
आतापर्यंत सत्ता आल्या गेल्या, आमदार झाले मंत्री झाले सर्वांनी जनतेच्या या वचन नामाला जागते झाले ? पुन्हा तेच आश्वासन, तोच जनतेचा वचननामा! काय तर मी करून दाखवणारच...!
जिल्ह्यातील बेरोजगारी, औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना रोजगार, शेकडो कंपनीत परप्रांतीयाचे लोंढे, भूमिपुत्राची कुचंबना, प्रकल्पग्रस्तांना वाटेला आलेली बेरोजगारी, कंपन्याचे व्यवस्थापन, व प्रशासनाकडून होणारी होळपळ , नागरिकांना सुविधा, महिलांचे व शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रत्येकाच्या हाताला काम, आणि बेरोजगार मुक्त जिल्हा अशा अनेक नानाविध समस्याचा फाडा जनतेच्या वचननामा लिहून.. हे शक्य आहे...?
येणारा भावी आमदार नेहमीप्रमाणेच इच्छा सर्वांना भेटण्याची आहे पण, वेळेअभावी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. तर तुमची आतापर्यंत या राजकीय फसगत लोकनेत्यांनी बोळवण म्हणूनच केली. आणि करतीलही यात कुणाचेही दुमत नाही. म्हणून बोंबाटा मारणारे, पोहळ्यातून निघणारे काही वर्षांतूनच नेतागिरीत येऊन पुढारी बनवून आपली बलाढ्य संपत्ती बनवून आपल्या मागे दोन-चार बॉडीगार्ड ठेवणारे नेते खरंच निवडून आल्यावर आपला रुबाब दाखवणार नाहीत काय?
हीच खरी पावती जनतेला समजली तर यात काही वाईट वाटायला नको ! मी निवडून आलो तर, आपल्या विश्वासाला तळा जाणार नाही! हे शब्द राजकीय नेत्यांच्या प्रमोद वाणीत वापरतो तोच खरा जनसेवक म्हणायचा का?
असेच चंद्रपूर शहरात आमदारकीत फिट बसणारे चेहरे समोर येऊ लागले आहेत. एकंदरीत पावसाळी मेंढक म्हटले तरी बरे होईल ! कारण यानंतर पुन्हा पाच वर्षापर्यंत कोणीही जनतेचा वचननामा घेऊन समोर येणार नाहीत!
म्हणून जून ते सोन! असा योग्य निर्णय मतपेटीतून जनताच देईल असे जाणकाराचे मत आहे!