चोरगाव येथून 'स्वच्छता ही सेवा'अभियानाचा शुभारंभ
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (प्रतिनिधी )
दिनांक 17 सप्टेंबर 2024 स्वच्छता ही सेवा अभियानाच्या आज शुभारंभ प्रत्येक गावात करण्यात आला. जिल्हास्तरीय शुभारंभ चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव या गावात गावाचा परिसर स्वच्छ करून करण्यात आला .यावेळी गावात स्वच्छते विषयी सातत्य राखण्याकरिता व शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याकरिता लोकांनी स्वतःहून सहभागी होणे गरजेचे आहे .असे मत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नूतन सावंत यांनी व्यक्त केले.
स्वच्छता ही सेवा अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नूतन सावंत व चंद्रपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी गावातील सतत घाण राहणारे ठिकाणे यांची निवड करून ,आज गावाच्या सहकार्याने व सहभागाने श्रमदानातून स्वच्छ करण्यात आले .यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी गावातील सरपंच तृणाली धंदरे, ग्रामसेवक सुरज आकणपल्लीवार उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,अंगणवाडी सेविका , आशा वर्कर, जिल्हास्तरावरील कर्मचारी, चंद्रपूर पंचायत समितीचे कर्मचारी गावातील ग्रामस्थ ,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्ताविक स्वच्छ भारत मिशनच्या गट समन्वयक अर्शिया शेख , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मडावी मॅडम तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक हरीश ससनकर यांनी केले.
आज पासून २ ऑक्टोबर२०२४ पर्यंत स्वच्छता ही सेवा अंतर्गत असेच विविध उपक्रम राबवून गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याकरिता जनजागृती करून, लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील सर्व गावात आज मोठ्या प्रमाणात स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक गावात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होऊन, गाव स्वच्छ करण्याकरिता पुढे आले.