जामिनावर सुटून आलेल्या आरोपीने पुन्हा महिलेच्या घरावर केला हल्ला, दिली जीवे मारण्याची धमकी !




जामिनावर सुटून आलेल्या आरोपीने पुन्हा महिलेच्या घरावर केला हल्ला, दिली जीवे मारण्याची धमकी !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (वरोरा) :-
वरोरा तालुक्यातील नागरी या गावी दिनांक 1/9/20 24 ला वरोरा पोलीस स्टेशन येथे आरोपी शंकर रमेश शिवणकर अटक करण्यात आली होती. परंतु तक्रारदार रूपाली प्रशांत झाडे यांच्या म्हणण्यानुसार वरोरा पोलिसांनी आमचे काही न ऐकून घेता थातूरमातूर कारवाई करून आरोपीला गुन्हा दाखल करून दोन दिवसातच परत आरोपी जामिनावर सुटून आल्यावर दिनांक 4/ 9 /2024 ला रात्र साडेआठ वाजता पुन्हा हल्ला व जिवे मारण्याची धमकी दिल्याने संबंधित परिवार भयभीत झाले आहेत. या संदर्भातील तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्ली असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेतून पीडित परिवाराने दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शंकर रमेश शिवणकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध कलमाखाली अनेकदा गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. गावातील तंटामुक्त अध्यक्षांनीही शंकर रमेश शिवणकर हा नक्षलवादी व दहशतवादी आहो अशा प्रकारची नेहमी धमकी देत असल्याची तक्रारी त्यांनी दिली होती. अशी माहिती त्यांनी पत्रकाराना सांगितली.
हा दारूचा व्यवसाय करीत असल्याने पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप ही पत्रकार परिषदेतून केला.
महिलेला घाणेरड्या शिवीगार करून जवळ शस्त्र व सतुर खिशात चाकू घेऊन त्याने संबंधित महिलेच्या घरावर हल्ला केल्याची माहिती त्यांनी सांगितली. तुझी बेजीती करून करून तुला मर्डर करतो अशा धमक्या दिल्या.मोठे दगड व लाथा मारून तक्रार करण्याचे घराच्या दरवाजाही तोडून टाकला. त्यामुळे लहान मुले, व घरातील परिवार दहशतीत आहे. संबंधित गावकरी जमा झाल्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु कुणालाही जुमानला नाही. गावातील नागरिकांसोबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता. माझे म्हणणे न ऐकता तक्रारी मध्ये चुकीचे बयान लिहिले. व संबंधित आरोपीला सहकार्य केले. असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला.
आरोपी जामिनावर सुटून आल्यावर दिनांक चार तारखेला साडेआठ वाजता रात्र पुन्हा येऊन शिवीगाळ केली. आणि पोलीस माझ्या खिशात आहेत 50 हजार रुपये दिले आणि मी मोकळा झालो. तुझा व तुझ्या पतीचा मर्डर करून पुन्हा कारागृहात जातो. माझं कोणी वाकड करू शकत नाही. अशा प्रकारची धमकी देऊन पुन्हा गावात दहशत निर्माण करण्याची धमकी दिली. अशा गुन्हेगारावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी आज पीडित परिवाराने पत्रकार परिषदेतून केली.