गडचांदूरातील नो पार्किंग झोन पूर्णतः मोकळा
भाजपाच्या आंदोलनाचा दणका
दिनचर्या न्युज :-
गडचांदूर - ओद्योगिक शहर म्हणून ओळख असलेले गडचांदूर शहराचे सभोलताल मोठ मोठे चार सीमेंट उद्योग असल्याने या ठिकाणी मालवाहू वाहनाची मोठी वर्दळ असते.त्यामुळे इतरस्त्र ठिकाणचे ट्रान्सपोर्ट धारक यांनी आपले कार्यालय गडचांदुर या मध्य ठिकाणी सुरू केले. परंतु यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेकडो गाड्या असताना स्वतः पार्किंग ची व्यवस्था केली नाही.आणि मनिकगड सिमेंट कंपनीने नाममात्र पार्किंग ची व्यवस्था केली.त्यात एवढ्या मोठया गाडया राहू शकत नाही त्यामुळे ट्रान्सपोर्ट वाल्यांनी काही पोलीस विभागाचे कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने शहरातील नो पार्किंग झोन असलेल्या रोडच्या बाजूला पार्किंग चालू केली.त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत होता.तर थूटरा रोडच्या बाजूला वस्ती आहे. व त्या ठिकाणीं ड्रायव्हर लोक आपल्या गाडया उभ्या करतात व स्वयंपाक,जेवण ,अंघोळी करतात कपडे बदलवितात महिलांना टाऊंटिंग करण्याचे प्रकार करतात.त्यामुळें तेथील महिला भयभीत झाल्या होत्या.याबाबत अनेकदा पोलीस स्टेशनला तोंडी वा लेखी तक्रार दिली. असताना सुध्दा त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होते.तेव्हा भारतीय जनता पार्टी गडचांदुर शहर अध्यक्ष अरविंद डोहे,महामंत्री हरीश घोरे, रामसेवक मोरे,शंकर आपूरकर,यांचे नेतृत्वात दिनांक 20 आगस्त रोजी पोलिस स्टेशन ला निवेदन देवून चार दिवसात नो पार्किंग झोन मधील उभ्या असलेल्या गाड्या विरुध्द कार्यवाही करा अन्यथा आम्ही भारतीय जनता पार्टी चे वतीने दिनांक 26/08/2024 रोजी नो पार्किंग झोन मधील उभ्या गाड्याची हवा सोडून रस्ता रोखू अश्या प्रकारचे निवेदन दिले. पोलीस स्टेशन चे कर्त्यव्य दक्ष पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी तात्काळ दखल घेत संपूर्ण नो पार्किंग झोन मधील गाड्या विरुध्द
कार्यवाही करून रस्ता पुर्णतः मोकळा केला.त्याबद्दल पोलीस निरीक्षक यांचे आभार मानले व नेहमी आम्ही या कडे लक्ष ठेवू असे आश्वासन सुध्या दिले.परंतु या पुढे जर का ट्रान्सपोर्ट वाल्यानी मुजोरी करून परत रोड च्या बाजूला गाड्या उभ्या केल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपले ऑफिस सुध्या बंद पाडेल.अश्या प्रकारे शहर अध्यक्ष अरविंद डोहे यांनी आपल्या मनोगतात इशारा दिला.या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश जी शर्मा, तालुका अध्यक्ष संजय मुसले,तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, जिल्हा युवा उपाध्यक्ष रोहन काकडे, विट्ठल धांडे,प्रफुल पाल,महालींग कांठळे,बबलू रासेकर,सत्यदेव शर्मा,अशोक दरेकर,विनायक चौधरी,अजीम बेग,धर्मा वाघमारे,विनोद बट्टलवार,मारोती यापलवार, सतीश आत्राम,
विजय डाखोरे, रोशन चव्हाण,सुधाकर बोरिकर,श्रीकांत सातपुते, रामेश्वर सिंग,संजय बोरडे,गजानन चिरडे,दिवाकर धनवलकर,जयंता भोंगळे,मनोज तुरानकर ,विजय अंड्रस्कर, विनोद सोनुले सुनील मोहेलर, मेहताब सर,राजू बुरटकर,दत्ता धुळे ,अंकित कष्टी, गणपत बुरटकर, आत्राम,रमाकांत काळे,भास्कर उरकुंडे, बंटी गुरनुले,तानाजी देशमुख,रमेश चुदरी,महादेव विरुटकर,देविदास पेंदोर,शुभम पेंढारकर, सुभाष धुळे,संकेत वाघमारे, प्रकाश धुळे,सुधीर ब्रहांपूरे,राहुल भार्गव, प्रकाश शिंदे,गणेश याप्पलवार, सुरेश यापलवार,मनीष राजभर,अनिल यापलवार,तर महिला
विजयालक्ष्मी डोहे, रंजनाताई मडावी, विनाताई मुद्दलवर, शितलताई धोटे, उमाताई कंटाळे, नमिता विश्वास, शालीनीताई बेले, आवडे ताई, देरकर ताई, अंजू जीवने, अंजली विश्वास, भार्गव ताई, मायाताई चव्हाण, सुमनबाई आत्राम, कंन्यकाबाई टीकेदार,रुपा जोंधळे, पूनलाताताई धुळे, जिजाताई दवने, ज्योतिबाई धुळे,सीमा पतंगे,लक्ष्मी धुळे, लक्ष्मी वाघमारे,शिलाताई पाईकराव, वनिता निमगडे,ललिता यापलवार, पांचाबाई वाळवे आदी उपस्थित होते.