शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथे रस्ता सुरक्षा मोहीम यशस्वी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि टी व्ही एस मोटर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विधी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. टी व्ही एस मोटर च्या विकेड राडा या उपक्रमाचे संयोजक अक्षय बोरुले, हारुन शेख, प्रवीण आणि तुलसीदास यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या प्रसंगी अक्षय बोरुले यांनी विद्यार्थ्यांना वाहन चालवताना घ्यावयाची काळजी आणि ट्रॅफिक नियमाची अंमलबजावणी याचे महत्व विषद केले. महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी सर्व उपस्थितनाचे हार्दिक स्वागत केले आणि टी व्ही एस च्या विकेड राडा या उपक्रमाचे औचित्य सांगितले. या उपक्रमा अंतर्गत विधी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना 500 रू चे अमोझोन चे free कुपन प्रदान करण्यात आले. तसेच विकेड राडा या उपक्रमा अंतर्गत लकी ड्रा च्या माध्यमातून विधी महाविद्यालयातील विध्यार्थी जुनेद याकूब शेख यांना सॅमसंग galaxy मोबाईल भेट स्वरूप देण्यात आला. या रस्ता सुरक्षा आणि काळजी मोहिमे अंतर्गत विधी महाविद्यालय तील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी होण्यासाठी प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी आव्हान केले. या उपक्रमाला विदयार्थ्यांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.