महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटनाचे राज्यव्यापी आंदोलन, आमरण उपोषण पाचव्या दिवशी सुरूच !




महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटनाचे राज्यव्यापी आंदोलन, आमरण उपोषण पाचव्या दिवशी सुरूच !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 24 संघटनाच्या वतीने शासन आणि प्रशासन यांच्या विरोधात घेण्यात महानिर्मितीच्या महाराष्ट्रातील एकूण १६००० हजार कंत्राटी कामगार यांच्या जिव्हाळ्याच्या प्रमुख ९ मागण्याला घेऊन राज्यव्यापी आंदोलन घेण्यात आले आहे . चंद्रपूर, खापरखेडा ,कोराडी ,पारस ,भुसावळ, नाशिक, सर्वत्र काम बंद आंदोलन सुरू असून तसेच आमरण उपोषण करते दिनांक २०/०८/२०२४ पासून आमरण उपोषण करत असून आज दिनांक २४/०८/२०२४ ला आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र येथे आमरण उपोषण सुरू असून उपोषण कर्ते मा. हेरमन जोसफ हे आमरण उपोषण करीत आहे.
महाराष्ट्रातील सर्व पॉवर स्टेशन गेट वर दि १६.८.२४ रोजी निदर्शने द्वारसभा, संविधान चौक, नागपूर येथे कृति समितीच्या प्रमुख पदाधीकार्याचे दी १७,१८ व १९ रोजी साखळी उपोषण आंदोलन व त्यानंतर आमच्या मागण्यांवर विचार न झाल्यास दि. २०.८.२४ पासून महाराष्ट्रातील पॉवर स्टेशनच्या गेटवर आमरण उपोषण, आमरण उपोषण पोलीस दडपशाही करून मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाच्या आधी दी २२.८.२४ रोजी पॉवर स्टेशनवर गेट मीटिंग घेऊन दि. २३.०८.२४ रोजी सर्व पॉवर स्टेशन मधील कंत्राटी कामगार "टुल डाऊन" आंदोलन करतील व त्यानंतर दि २४.०८.२०२४ पासून महानिर्मिती पॉवर स्टेशन मधील राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होईल... महानिर्मितीच्या बहुसंख्य कंत्राटी कामगार युनियननी स्थापन केलेल्या ."महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती तर्फे आंदोलनाची नोटीस.
दि. ९.३.२४ रोजी नागपूर येथे ना. उप मुख्यमंत्री मा. फडणवीस यांचेशी झालेली चर्चा व वीज कंत्राटी संप स्थगित करण्यात आला होता. परंतु शासन प्रशासनाने कंत्राटी कामगाराचा, त्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले.
तोंडी आश्वासन देऊन बोळवण केली.
कोणत्याही मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन व वीज मंडळ व्यवस्थापनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.
या चिडी पोटी जुन्या कृति समिती मधिल इतर इतर महावितरण व महापारेषण मधील कंत्राटी कामगारांच्या संघटना वगळून फक्त महानिर्मितीच्या राहिलेल्या महानिर्मितीच्या बहुसंख्य २४ युनियन महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगार युनियन आहेत.
त्या वरील २४ युनियननी मिळून जुन्या कृती समिती मधून बाहेर पडून महानिर्मिती कंपनी मधील २४ युनियनने फक्त महानिर्मिती कंपनीसाठी वेगळी कृती समिती काल दि.१९.७ २४ रोजी स्थापन केली आहे. या स्थापन केलेल्या वरील कृति समितीचे नाव "महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती आहे. दिनांक २७.०७.२०२४ च्या नागपूर येथील वरील महानिर्मिती मधील कंत्राटी कामगार संघटनांची फिजिकल मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये वरील कृती समिती स्थापन करण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्तब करण्यात आले.
"महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र शासन, मराविमं सुत्रधारी के लिव महानिर्मिती व्यवस्थापनाकडे खालील मागण्या आहेत.
महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारात (बेसिक + पूरक भत्ता १
एप्रिल २३ पासून ३०% वेतनात वाढ करून देण्यात यावी.
,सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना समान कामास समान वेतन देण्यात यावे.
,मा. मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून महानिर्मिती मधील सर्व
कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार एन एम आर च्या माध्यमातून देऊन नोकरीमध्ये सुरक्षा द्यावी व तसेच महानिर्मिती कंपनी कोणत्याही कंत्राटी कामगाराला काढणार नाही असे परिपत्रक महानिर्मिती व्यवस्थापनाने त्वरित निर्गमित करावे.
महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी ई एस आयची वेतन मर्यादा ओलांडली आहे त्यामुळे ई एस आय चा वैद्यकीय लाभ त्यांना मिळत नाही तरी अतिरिक्त लाभ म्हणुन मेडिक्लेम योजना सुरू करण्यात यावी.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगार यांना नियमित नियमित कामगार प्रमाणे नक्षलग्रस्त भत्ता
लागू करण्याबाबत.
दी.९.३.२४ रोजी नागपूर येथे ना. उप मुख्यमंत्री मा. फडणवीस यांचेशी झालेल्या चर्चेत आश्वासन दिल्या प्रमाणे महानिर्मिती कंपनीच्या भरती परीक्षेत सेवेतील प्रत्येक ५ वर्षासाठी ५ गुण असे २५ गुण अतिरिक्त देण्यात यावे व ४५ वर्षाची वयोमर्यादा करण्यात यावी.
,नवीन पद्धतीचा महानिर्मिती कंपनीचा लोगो व required by contractor नेमुद असलेल्या गेट पास रद्द करण्यात
यावा व जुन्या पद्धतीचाच गेट पास सुरू ठेवावा.
,खापरखेडा पॉवर स्टेशन मधील दिनांक ७ मार्च २४ या दिवशी गेटवरील संप आंदोलनात पोलिसांनी ज्या कंत्राटी ,कामगारां वर खोटे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत. महानिर्मितीमधील ऑटम वाईझ टेंडर व as an when required पद्धती रद्द करून लेबर कॉन्ट्रॅक्ट AMC पद्धत सुरू
करावी तसेच प्रशासनाने ३ नोव्हेंबर २३ ला ११२२० या क्रमांकाचे आणि २१ नोव्हेंबर २९२३ चे जे परिपत्रक काढले आहे त्यानुसार १०% कमी इन्स्ट्रमेंट आणि लेबर कपात करण्यात येते. त्या मधून लेबर कपात हे वगळण्यात यावे. त्वरित थांबवण्यात यावे. कंत्राटदार वरील पत्रकाचा गैर अर्थ काढून कामगारांना घरी बसवतात त्याचाच परिणाम दिनांक २८.७.२४ रोजी भुसावळ पॉवर स्टेशन मधील चेतन तायडे या कंत्राटी कामगाराला घरी बसवण्यात आले. शेवटी बेरोजगारी मुळे उद्ध्वस्त होऊन चेतन तायडे या कंत्राटी कामगाराने आत्महत्या केली.
तरी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती, २०२४ मधील सर्व संघटना प्रतिनिधी सोबत सकारात्मक चर्चा करून वरील मागण्या मान्य न झाल्यास वरील विषयात उल्लेख केल्याप्रमाणे साखळी उपोषण, आमरण उपोषण, "टुल डाऊन" आंदोलन व बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल व त्याने जर
ओद्योगिक शांतता विचलित झाली तर त्याची जबाबदारी महाराष्ट्र शासन, मरा वि में सुधारी कंपनी लि व महानिर्मिती कंपनी लि. व्यवस्थापनावर राहील पत्रकार दिलेल्या माहितीतून प्रशासनाला . नचिकेत मोरे
सेक्रेटरी जनरल,एम.एस.ई.बी. वर्क्स युनियन (पॉवर फ्रंट),
भाई चैनदास भालाधरे अध्यक्ष,मराविनि रोजंदारी मजदूर सेना,
श्री. सतीश तायडे,अध्यक्षसंघर्ष कंत्राटी कामगार समिती (पारस),
श्री. प्रफुल्ल सागोरे अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेवा (चंद्रपुर)
श्री. राहुल नागदेवे अध्यक्ष
भारतीय जनता कामगार महासंघ
कमलेश राणे अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कंत्राटी कामगार संघटना (सिटू)
श्री. मिलिंद गाडेकर अध्यक्ष
भारतीय कामगार बुनियन कामठी कोराडी
श्री. शंकर गडाख,अध्यक्ष
• रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन
बंडू हजारे अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेना (शिंदे गट)
प्रमोद कोलारकर अध्यक्ष,कंत्राटी कामगार सेना,
वामन मराठे,सरचिटणीस
ऑल इंडिया रोजंदारी,कामगार युनियन
,श्री. बंडूजी मडावी
विदर्भ अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष
जनसेवा वीज कंत्राटी कामगार संघटना,चंद्रपर
श्री. सुरेश भगत,अध्यक्ष
म.रा. बहुजन कामगार संघटना (प्रकाश आंबेडकर)
श्री. जितेंद्र पानतावणे
अध्यक्ष
राष्ट्रीय बहुजन सुरक्षा रक्षक व कामगार संघटना
श्री. वामन बुटले अध्यक्ष
• विदर्भ जनरल लेबर युनियन (सीटू)
श्री. मंगेश चौधरी सचिव
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना (चंद्रपुर)
श्री. वामन मानकर
अध्यक्ष
श्री. गणेश सपकाळे
अध्यक्ष
आझाद कामगार एकता युनियन
श्री. रमेश गणोरकर
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना (कंत्राटी युनिट)
श्री. निताई घोष
जनरल सेक्रेटरी
जनरल वर्क्स युनियन चंद्रपुर (इंटक)
वीज निर्मिती कंत्राटी कामगार संघटना (लाल बावटा)
श्री. राजेश पखिड्डे
सचिव कन्स्ट्रक्शन वर्कस युनियन (आयटक)
श्री. नितिन वाढई अध्यक्ष
बहुजन वि‌द्युत निर्मिती कंत्राटी कामगार युनिय
हरमान जोसेफ
अध्यक्ष
यंग चांदा ब्रिगेड,वीज कंत्राटी कामगार संघटना
श्री. मारुती झाडे,उपाध्यक्ष
जय भवानी कंत्राटी कामगार संघटना इत्यादी संघटनांनी
इशारा दिला आहे.