सुरक्षा कवच नसल्याकारणाने 26,340 वाहन चालकावर कारवाई, लाखोचा दंड पोलिसांकडून वसूल !



सुरक्षा कवच नसल्याकारणाने 26,340 वाहन चालकावर कारवाई, लाखोचा दंड पोलिसांकडून वसूल !

शारीरिक आणि आर्थिक नुकसान होणार नाही - पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर
दरवर्षी वाहतूक पोलीस विभागाकडून तसेच उप प्रादेशिक कार्यालयाकडून वाहनाचे नियम पाळण्याचे आदेश वाहन चालकांना दिले जातात. परंतु अनेक वाहन चालक निमाला डावलून दारू पिऊन वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, रॉंग साईड चालणे, मोबाईलवर संभाषण करणे, अशा वेगवेगळ्या सुरक्षा कवचाला बगल देऊन काही वाहनचालक नियम डावलून रस्त्यावर वाहने चालवत असतात. अशा वाहनचालकांवर वाहतूक विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असून, त्यामुळे गेल्या 7 महिन्यांत म्हणजे जानेवारी ते 5 जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण 26 हजार 340 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आहे. रुपये जमा झाले. यामध्ये हेल्मेट नसणाऱ्या वाहनचालकांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्या १४ हजार ९९२ वाहनचालकांवर कारवाई.
3875 मद्यधुंद वाहनचालकांना पोलिसांनी पकडले, गाडी चालवताना सीट बेल्ट न लावणारे 7446 वाहन चालका व कारवाई केली.
लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आणि त्यांच्याकडून 8 लाख 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. चुकीच्या मार्गाने चालवणाऱ्या 27 वाहन चालकावर कारवाई करण्यात आली.

नियम पाळा
शारीरिक आणि आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या !
वाहतुकीचे नियम केवळ वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आहेत. नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील आणि दंड भरावा लागणार नाही. त्यामुळे वाहनचालकांचे कोणतेही शारीरिक व आर्थिक नुकसान होणार नाही. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवावे.
- प्रवीणकुमार पाटील, यातायात
पोलीस निरीक्षक