उपमुखमंत्री अजित दादा पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ गरजु विद्यार्थिनींना सायकल वाटप



उपमुखमंत्री अजित दादा पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ गरजु विद्यार्थिनींना सायकल वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचा उपक्रम.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : राज्यातील अनेक भागात आजही मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक गावातील मुलींना पाचवी नंतरची सुविधा नसल्यामुळे अनेक मुलींना परगावी शाळेपर्यंत जाण्यासाठी कुठलीही वाहतूक सुविधा नाही किंवा तुटपुंजा स्वरूपाच्या सुविधा आहेत. त्यामुळे अनेक मुलींचे शिक्षणही बंद केले जाते. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक कुटुंबातील पालक आपल्या मुलींसाठी वाहतूक सुविधा किंवा सायकल खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते त्यामुळे शाळेत मुलींची मोठी गळती होते. ही गळती थांबवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी ६५ गरजु विद्यार्थिनींना मोफत सायकल भेट दिल्या.

त्यामुळे आता या अनेक मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी सायकल उपलब्ध झाल्या आहेत. मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणाद्वारे मुलींना स्वतःची हक्काची जाणीव करून देण्यासाठी तसेच समानता राखण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे असून ते आताच्या काळात मुलींसाठी दारिद्र्य निर्मूलनासाठी देखील महत्त्वाचे आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील लिंग भेदाच्या आव्हानाला सामोरे जाताना मुलींच्या शिक्षणाकडे अनेक कुटुंब दुर्लक्ष करतात. या समस्याला मुलींना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते.

त्यामुळे मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचा सामाजिक विकास करण्यासंबंधाने सदर सामाजिक उपक्रम राबवल्या गेला. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा होणारं तसेच स्त्री वर्गाच्या आरोग्यावर आणि आर्थिक भविष्यावर सकारात्मक परिणाम यातून दिसून येणारं असे मत जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

सदर सायकल वाटप कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचेसह आबिद अली, राजीव कक्कड, रंजना ताई पारशिवे, राकेश सोमाणी, सुनील काळे, विलास नेरकर, अमोल ठाकरे, सुजित उपरे, अभिनव देशपांडे, संजय सेजूळ, पंकज ढेंगारे, अमर गोमासे, चारुशीला ताई बारसागडे, भोलू भैय्या काच्चेला, ओंकार गेडाम उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गणेश बावणे, अभिजित खन्नाडे, सचिन मांदले, नितीन घुबडे, तिमोटी बंडावार, रोशन फूलझेले, विशाल नायर, राहुल भगत, नितीन रत्नपारखी, संदीप बिसेन, अनुकूल खन्नाडे, आकाश बंडीवार, भोजराज शर्मा, निशांत वाकडे, आसिफ खान पठाण, ऋतिक रिठे, राजकुमार खोब्रागडे, नेहाल मुंगलमारे, सौरभ घोरपडे, राजु रेड्डी, राकेश रेपेल्लीवार, प्रतीक भांडवालकर, अंकित ढेंगारे, धीरज दुर्योधन, पवन जाधव, निलेश टोंगे, अश्विन ठोंबरे, पियुष चांदेकर, रोशन ढवळे, अमोल पारशिवे, पवन बंडीवार, छोटू कातकर, विक्की रायपुरे, विशाल मंगर, सुनील ईटकर, दत्तू कुचनकर, बंटी मेश्राम, छोटू रायपुरे, राहुल वाघ, महेश ढेंगळे, अश्विन सल्लम, सन्नी शर्मा, निशांत लिंगमपल्लीवार, रतन मंडल, दिवाकर वाढई, अनुराग चटप यांनी अथक परिश्रम घेतले.