चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसात सुरू करा अन्यथा मनपा समोर आंदोलन - बेबीताई उईके
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर -
चंद्रपूर शहरातील मागील पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी उन्हाळ्याप्रमाणे वन वन भटकावे लागत आहे. शहरातील अमृत योजना पूर्ण फेल झाली असून अमृत योजनेचे जल हे कंत्राटदराच्या घशात गेले आहे. जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून सतत दार पाऊस सुरू असून सुद्धा शहरात पाण्याची टंचाई असणे म्हणजे मनपाची कटपुतली भूमिका असल्याचे चंद्रपूर शहरातील नागरिकाचे म्हणणे आहे. यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पवार गट जिल्हा महिला अध्यक्षा बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत मुख्य अभियंता बोरीकर साहेब यांच्या तर्फे मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. संबंधित पाणीपुरवठा दोन दिवसात मनपाने सुरळीत केला नाही तर महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, जिल्हासंघटक सरस्वती गावंडे, जिल्हा सचिव शोभाताई घरडे ,नीलिना आत्राम . प्रियोबाला गावंडे, सुषमा डांगे अमिता गावंडे महिला उपस्थित होते.