चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई पदाकरीता लेखी परिक्षा 28 जुलैला



चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई पदाकरीता लेखी परिक्षा 28 जुलैला

लेखी परिक्षा अंत्यत पारदर्शक पध्दतीने होणार -मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२-२३ मध्ये एकुण १३७ पोलीस शिपाई पदाकरीता सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रिया मध्ये महिला/पुरुष/तृतीयपंथी यांचे दिनांक १९ जुन, २०२४ पासुन ते १२ जुलै, २०२४ पावेतो घेण्यात आलेले मैदानी चाचणी (शारिरीक क्षमता) मध्ये ५० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण घेवुन लेखी परिक्षा निवड यादी ही दिनांक २२/०७/२०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचे वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

सदर लेखी परिक्षा करीता निवड यादी ही मैदानी चाचणी मध्ये ५० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण घेवुन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधुन १:१० या प्रमाणात बसणाऱ्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या जातीनिहाय प्रवर्गात उपलब्ध असलेल्या जागांनुसार व समांतर आरक्षण-निकषांनुसार अत्यंत पारदर्शकतेने तयार करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२-२३ चे लेखी परिक्षा करीता एकुण १३२१ उमेदवार ज्यात ८७९ पुरुष, ४४० महिला आणि २ तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे.

सदरची लेखी परिक्षा दिनांक २८ जुलै, २०२४ रोजी सकाळी ०९:३० वाजता सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथेघेण्यात येणार आहे. त्याककरीता उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर सकाळी ०७:०० वाजता उपस्थित व्हावे. परिक्षा सुरु होण्याचे ३० मिनीटा अगोदर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

लेखी परिक्षा करीता येतांना उमेदवारांनी सोबत फक्त महा. आय.टी. कडील प्राप्त होणारे प्रवेशपत्र, ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसंस यापैकी कोणतेही एक मुळ ओळखपत्र आणि २ नग पासपोर्ट साईज फोटो आणणे अनिवार्य आहे.

लेखी परिक्षा करीता उमेदवारांनी कोणतेही आक्षेपार्ह / संशयीत वस्तु आणि पॅन, पुस्तके, अभ्यास साहित्य, मोबाईल, स्मार्टवॉच, इअरफोन/हेडफोन, कॅल्क्युलेटर किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रानिक्स डिवाइस परिक्षा केंद्रा आंत सोबत घेवुन जाता येणार नाही.

संपुर्ण लेखी परिक्षा अंत्यत पारदर्शक पध्दतीने होणार असुन त्यात उमेदवारांच्या ओळख पटविण्यासाठी बायोमॅट्रिक थंब ओळख, फोटो द्वारे करण्यात येणार आहे. परिक्षा केंद्रातील प्रत्येक कक्षात व्हिडीओ रेकॉर्डीग करण्यात येणार आहे.

तरी, लेखी परिक्षा करीता पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत परिक्षा केंद्रा उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.