पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरातून प्रचाराचा नारळ फोडून ,काँग्रेसच्या आरोपाला सडेतोड उत्तर !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर आणि चिमूर,गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार व अशोक नेते यांच्या प्रचारात मोरवा विमानतळाच्या भव्य पटांगणात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आले होते. नरेंद्र मोदी यांनी मराठीतील सुरुवात करून चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकाली आणि भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भाषणाला सुरुवात केली.
त्यांनी इंडिया आघाडीच्या फूट पाडा आणि राज्य करणाऱ्या काँग्रेस सरकारवर टीका केली. चंद्रपुरात विजय संकल्प सभेला आयोजित सभेत मोदी मार्गदर्शन करताना म्हणाले. काँग्रेसचा घोषणा पत्रात मुस्लिम लीगची भाषा आहे. हे पाहता लोकसभेची निवडणूक स्थिरता विरुद्ध अस्थिरता असल्याचे उत्तर मोदी यांनी काँग्रेसच्या आरोपाला केले. काँग्रेसने निवडणुकीत प्रचारादरम्यान हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई असल्याचा आरोप सातत्याने सुरू केला आहे. काँग्रेसच्या या आरोपाला न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. काँग्रेसने परिवार वादाचा विकास केला. राज्याच्या विकासात कोणताही प्रकल्प आणला नाही. मुंबईत मेट्रो पंतप्रधान आवास योजना, जल शिवार योजना, काश्मीर भारताचा हिस्सा आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार आल्यापासून
केंद्र आणि राज्याच्या सरकार मिळून चौफेर विकास करत असल्याचा नरेंद्र मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यापासून चा इतिहास तपासून पाहिल्यास काँग्रेस समस्येच्या माहेरघर करून ठेवले. दहशतवालाला संरक्षण देण्याचे काम काँग्रेसने केले .काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणा पत्रात मुस्लिम लींगचु भाषा आहे. आणि हे अजिबात स्वीकारणार नाही. लोकसभेची निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची असल्याचा अप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. पण वास्तव्यात ही लढाई स्थैर्य विरुद्ध अस्थर्याची आहे. हा जनसमुदाय पाहता
चंद्रपूर करांचे कौतुक केले. उन्हाचा वाढता पारा असून सुद्धा उपस्थित जन समुदाय मधील जोश पाहता चंद्रपूरकरांनी मोदी सरकार साठी मत बनवल्याचा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर लोकसभेतून सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली लोकसभेतून अशोक नेते यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. या विजय संकल्प सभेला चंद्रपुरातील मतदार संघातून मोठा जनसागर उसळला होता.
सभेसाठी आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीच्या फटका ! तीन ते चार घंटे वाहतुकीची कोंडी! ॲम्बुलन्सही अडकल्या !
नरेंद्र मोदी यांची सभा संपल्यानंतर सभेसाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांना निघण्यासाठी तब्बल तीन ते चार तास रस्त्यात तळपळत राहावे लागले. एवढेच नाही तर लहान मुलांना घेऊन आलेल्या महिलांना नाश्ता पाण्यापासून वंचित राहावे लागले. मुख्य मार्ग वाहतूक कोंडीमुळे दोन तास बंद ठेवण्यात आला. त्यामुळे एखाद्याला इमर्जन्सी जायचे असल्यास वाहन अडकल्यामुळे त्याला तात्काळात राहावं लागले. यात ॲम्बुलन्स सुद्धा अडकल्याच्या दिसून आल्या.
यामुळे काही नागरिकांनी मोदीच्या सभेवर नाराजी व्यक्त केली.
भर रस्त्यात महिलांचा वाहतूक कोंडीत आक्रोश पायला मिळाला.
प्रसारमाध्यमही बनली भाजपचे प्रचारक!
नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी देण्यात आलेल्या पत्रकारांना प्रवेश पासेसवर भाजपचे प्रचार चिन्ह असल्याने पत्रकार चांगला संभ्रम निर्माण झाला होता! की आपणही भाजपचे प्रचारक म्हणून जात आहो का? एवढ नाहीतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मीडिया कार्ड देण्यात आले होते. त्यांनीही मीडिया कक्षात बसून त्यांच्या गळ्यात आय कार्ड दिसून आले. आतापर्यंत झालेल्या मोठ मोठ्या सभेत पोलीस प्रशासनाकडून तपासणी करून पोलीस प्रशासनाचा अधिकृत कार्ड सभेसाठी मिळत असे प्रथमच असे झाले की, भाजप प्रणित कमळ असलेले आय कार्ड प्रसार माध्यमांना गळ्यात घालून बातमी संकलन करण्यासाठी जावे लागले!