विसापूर क्रीडा संकुलन येते उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिर
प्रवेश सुरू
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील क्रीडा संकुलन येथे उन्हाळी जलतरण प्रशिक्षणाचे प्रवेश देणे सुरू झाले आहे. यासाठी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा. अतिशय सुंदर अशा जलतरण तलाव असून
या तालुका संकुलनात भव्य दिव्य स्वरूपात नॅशनल आँलंपिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. जलतरण स्पर्धा झाल्या. वन संवर्धनाने नटलेल्या संकुलनात विद्यार्थी सराव करित असतात.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा व जलतरण शिकण्याचा भरभरून आनंद घेऊन जलतरणात प्रक्षिशित व्हावे. या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती आणि जलतरण स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शक आहेत. याचे श्रेय जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड चंद्रपूर व तालुका क्रीडा अधिकारी बल्लारपुर विसापूर मनोज पन्द्रम व जलतरण व्यवस्थापक व फिल्टर ऑपरेटर नीलकंठ चौधरी यांना जात आहे. अतिशय उत्कृष्ट असे जलतरण तलाव अत्याधुनिक पध्दतीने तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
यासाठी संपर्क करण्याचे आवाहन प्रशिक्षक कैलास किरडे 7030234232, मोरू भरडकर 7276717373, धनंजय वडयाळकर 9657347932, नितीन बुरडकर 9325952143, कैलास बुरडकर 8830014961 यांच्याशी संपर्क करावा व योग्य वेळात आपल्या पाल्यांचा उन्हाळी जलतरण प्रशिक्षणासाठी प्रवेश निश्चित करून घ्यावा आव्हान करण्यात येत आहे.