चंद्रपूर शहरात रस्त्यावर व्यापारांनी पुतळे ठेवून केले अतिक्रमण! मनपा व पोलीस प्रशासन सुस्त!



चंद्रपूर शहरात रस्त्यावर व्यापारांनी पुतळे ठेवून केले अतिक्रमण! मनपा व पोलीस प्रशासन सुस्त!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील रस्त्यावर अनेक व्यापाऱ्यांनी आपले अतिक्रमण केले आहेत. पहिले चंद्रपूर शहरातील रस्ते अरुंद असून त्यात फूटपात वर हाकर्स वाल्यांनी अतिक्रमण केले आहेत. फुटपाथ वरून जाणाऱ्या नागरिकांना जाण्यास रस्ताही नसतो. असा मनमानी कारभार चंद्रपूर शहरातील व्यापारांनी आपल्या दुकानासमोर पुतळे ठेवून अतिक्रमाचा विळखा तयार केला आहे.
या पुतळ्यांना आकर्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून त्यांना रस्त्यावर उभे केले जातात. जाणारा येणाऱ्यांची आकर्षन या पुतळ्यांकडे जात असते.
परंतु याकडे मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन बेशरमाचे सोंग घेऊन चंद्रपुरातील फुटपाट वर होणाऱ्या अतिक्रमण समस्याचा तोडगा काढण्यास अजूनही सक्षम झालेली दिसून येत नाही.
असाच प्रकार सध्या गोकुल गल्लीत सुरू आहे. पहिलेच वीस फूट गल्ली असून त्यातही व्यापारांनी आपले पुतळे उभे करून गल्लीला अतिक्रमाच्या विळख्यात टाकलाय. त्यातच या व्यापाऱ्यांच्या दोन्ही साईडला गाड्यांचा जमवाडा असतो. व्यापारांच्या दुकानाला पार्किंगची व्यवस्था नसल्याने ग्राहक रस्त्यावरच वहाने उभी करतात. अशा प्रकारच्या अनेकदा तक्रारी मनपा प्रशासनाला राजेश विराणी यांनी दिल्या.
परंतु कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मनपा प्रशासनाकडून आले नाही. एकंदरीत अशा प्रकारांना मनपा खत पाणी घालत असल्याचा आरोपही विरांनीनी केला .
चंद्रपूर शहर हे गल्लीचे शहर अशी ओळख असताना.त्यातही या व्यापारांच्या व फुटपाट वरील हॅकर्स वाल्यांच्या अतिक्रमाने चंद्रपुरातील अनेक रस्ते व्यापार आणि कब्जा करून ठेवले आहेत. याकडे कुठल्याही मनपा व पोलीस प्रशासनाचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते. असाच मुख्य रस्त्यावर त्रिमूर्ती हॉटेला कुठलीही पार्किंग नाही अनेक ग्राहक रस्त्यावरच आपल्या वाहन उभे करून उघड्यावर असलेल्या पदार्थांचा या हॉटेलमध्ये नाश्ता करतात. या मुख्य रस्त्यावरून अनेकदा पोलीस विभागाचे वाहने ये जा करतात. पण कुठल्याही परिस्थितीत आतापर्यंत चंद्रपूर शहराची वाहतूक व्यवस्था जशीच्या तशीच आहे. नवीन पोलीस अधीक्षक आले तेव्हापासून शहरात काहीतरी बदल होईल अशी आशा चंद्रपूरकरांना होती. परंतु ती निराशा झाल्याची दिसून येत आहे. आता याकडे पोलीस अधीक्षकांनी आणि मनपा प्रशासनाने जातीने लक्ष देऊन रस्त्यावर असलेल्या अतिक्रक्रमण धारकांना हटवावे. अशी मागणी चंद्रपूर करांची होत आहे.