' त्या' लोकप्रतिनिधीच्या कॅटलीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे ! आरोग्य अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात!




' त्या' लोकप्रतिनिधीच्या कॅटलीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे !

आरोग्य अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात!

तहसील कार्यालयातून संजय गांधी निराधार योजनेचाही लाभार्थी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यात राजकीय वरदस्ताचा कुठे आणि काय कसा उपयोग होईल याचे जिथे जागतिक उदाहरण जिल्ह्यात समोर आले आहे. शहरातील एका लोकप्रतिनिधीच्या कॅटलीचे काही दिवसापूर्वी कमरेच्या हाडाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. सूत्राच्या माहितीनुसार त्यांच्या कमरेतील हाडाचे बॉल बसवल्या गेले. आणि ते आज पूर्णपणे काम करण्यास सक्षम असल्याचे दिसून येत असताना सुद्धा. चंद्रपूर जिल्हा चिकित्सक कार्यालयातील आरोग्य विभागाच्या आंधळेपणाने सरसकट त्यात कॅटलीला अपंगत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले. यामुळे चंद्रपूर शहरात सगळीकडे गुप्त आवाजात चर्चा सुरू आहेत.
शासकीय नियमानुसार एखाद्या रुग्णाच्या हाळाचे प्रत्यारोपण केले असता ते प्रत्यारोपण केल्यानंतर त्याला चालता फिरता येत असेल तर अशा रुग्णांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देता येत नाही. परंतु जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि चक्क त्याला 42 टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकले. ते अपंगत्वाचे प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपात असून त्याची कालावधी तीन वर्षासाठी देण्यात आली आहे. तरी या महाशयाने शासनाच्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचा फायदा करून घेतला. तात्पुरत्या स्वरूपातील अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर शासनाचे कोणतेही लाभ घेता येत नाही. तरी चंद्रपूर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा मासिक 1500 रुपयाचा अर्थसाह्य निधीचा लाभ मिळवून घेतला. लक्कट पगार असलेल्या या कॅटलीला का बरे शासनाच्या योजनेचा लाभ कसा काय मिळू शकतो? हे प्रश्न मात्र प्रशासनाकडे  अनउत्तीर्ण आहे. संबंधित विभागाला विचारणा केली असता अशा प्रकारचे कुठलेही शासन निर्णय नसून संजय गांधी निराधार योजनेतून  अशा प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या   अपंगत्व प्रमाणपत्राला  शासकीय अर्थसाहयाची मदत करता येत नाही.
  ज्या आरोग्य विभागातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले प्रमाणपत्राची  वरिष्ठ आरोग्य विभागाच्या आयुक्त कार्यालयातून तसेच जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी  त्या लाभार्थ्याची चौकशी करून   संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी. तसेच शासनाच्या योजनेत समाविष्ट होत नसताना त्या योजनेचा फायदा देणाऱ्या संबंधित तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता  होऊ लागली आहे.


 पुढील अंकी वाचा तो कोण आहे ? कॅटली.!