प्रतिभा राखत मुनगंटीवारांवर तोफ डागली !





प्रतिभा राखत मुनगंटीवारांवर तोफ डागली !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून प्रतिभा धानोरकर यांनी नामांकन पत्र दाखल करण्यासाठी चंद्रपूर शहरातील कोहिनूर ग्राउंड येथून भव्य महा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची सभा ही न्यू इंग्लिश हायस्कूलच्या दर्गा ग्राउंड वर झाली.
काल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले . तत्पूर्वी त्यांची जाहीर सभा गांधी चौकामध्ये झाली . त्या सभेत बोलताना ते म्हणाले होते की, काँग्रेस हे फुटीरवादी झालेले आहे. तुटली आणि फुटली काँग्रेस आता निवडणूक लढणार आहे. निवडणूक काळात अनेक जण भावनिक होऊन मते मागतील. पण भावनिक होऊन चालणार नाही. तर विकास कोण करतो हे बघून मतदान करावे. मागील चार वर्षात बाळू धानोरकर खासदार असताना कुठलेही विकासाची कामे केले असे एक तरी दाखवून द्यावे असे आव्हान केले होते.
त्यांना प्रत्युत्तर देताना आज प्रतिभा धानोरकर आपली प्रतिभा राखत मुनगंटीवारावर चांगलीच तोफ  डागली. त्या म्हणाल्या की, 2019 ला ही संघर्ष करूनच बाळू धानोरकर यांना तिकीट मिळाली होती. आता पण संघर्ष करूनच तिकीट मिळाली त्याचे साक्षीदार आपण आहात .विद्यमान खासदाराचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करीन. आज शहरात  निघालेल्या रॅलीत अपेक्षा पेक्षा जास्त लोक आल्याने समोरच्या उमेदवाराला रात्रभर झोप लागणार नाही .अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर सुधीर मुनगंटीवार यांचे आताच बारा वाजले आहेत. एखादा नवरदेवाची इच्छा नसताना त्याचे लग्न लावून देणे हे काही संसार टिकण्या जोगे नाही. मी भावनिक नाही, तर एखाद्या  विधवा बाईच्या अश्रू वर संवेदनशील  वक्तव्यावर बाईच्या अश्रू व टीका करीत असतील तर त्यापेक्षा दुर्दैव दुसरं काय  असेल! यासाठी आपल्याला जनता माफ करणार नाही. मी भावनीक मत मागणार नाही परंतु ही निवडणूक हुकूमशाही विरोधी लोकशाही अशी आहे.  जिल्ह्यात स्वतःला विकास पुरुष समजणाऱ्या नेत्यांनी मी जे चार वर्षात केले ते तीस वर्षात काय केले याचा पहिले आराखडा द्यावा.  जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र, वीज उत्पादक केंद्र, देशात दुसऱ्या नंबरच्या प्रदूषण, बेरोजगारांची फळी, कुठे आश्वासन देऊन अजूनही बेरोजगारांना रोजगार मिळाले नाही. मग विकास कशाचा असे खळखळ बोल प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवारवर  तोफ डागली. स्वतःचा विधानसभा क्षेत्रात लोकसभेत धानोरकर यांना लीड होती ती शाबूत ठेवताना आली नाही,मग कसे काय लोकसभा लढता.  मी भलाही महापुरुष, संघर्षाच्या नेता नसेल पण मला लोक आशीर्वाद देतील, मी लोकसभा लढताना अश्रूची किंवा सहानुभूतीची गरज कुणाची नाही तर मला कामाच्या भरोशावर निवडून देतील. जाती पातीचे राजकारण मी करत नसून ज्या पक्षाने मला तिकीट दिली आहे. तो पक्ष  धर्मनिरपेक्ष आहे. राजा बोले दाढी हाले असा पक्ष नाही! म्हणून हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीची लढाई असेल. संविधान वाचवण्यासाठी, आपले हक्क अबाधित राहण्यासाठी हुकूमशाहीचा नायनाट करण्यासाठी मी लढत आहे. इंदिरा गांधीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे 'लाटो गोटी खायेंगे इंदिराजी को लायेंगे! अशी परिस्थिती निर्माण झाली होती तशी परिस्थिती आज जिल्ह्यात झाली आहे. म्हणून 'तब लढे थे गोरो से, अब लगे चोरो से! हुकूमशाही जिवंत ठेवण्यासाठी मी आपल्यासमोर मतरुपी पेटीत भरभरून यश द्यावे आशीर्वाद द्यावा अशे  आव्हान केले . यावेळी मंचावर आमदार सुधाकर अडबले,  ग्रामीण जिल्हा अध्यक्ष, सुभाष धोटे, माजी. जी. स.  अविनाश वारजूकर, राजेंद्र वैद्य, विनोद दत्तात्रय, संदीप गिरे, पप्पू देशमुख, ओबीसी नेते  बबनराव तायवडे, माजी आमदार वामन कासावर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, शोहल शेख, दिलीप जेऊरकर आणि सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि हजारोच्या  संख्येने नागरिकाची उपस्थिती होती.