2024 रणसंग्राम! "कोण किती पाण्यात" जनतेचा कौल... !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील 2019 लोकसभा निवडणुकीची परिस्थिती लक्षात घेऊन 2024 च्या लोकसभेचे परिशिष्ट काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून तयार केले जात आहे. गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या कारणाने बदलली आहे. त्यात जिल्ह्यातील स्थानिक राजकीय परिस्थिती सुद्धा वळणावर असल्याने निवडणुकीत "कोण किती पाण्यात" आहे. याची परिस्थिती जनतेच्या कौल मधून दिसणार आहे.
सन 2024 चे बिगुल वाजू लागल्याने चंद्रपूर लोकसभेच्या जागेचा रणसंग्राम सुरू झाला आहे.
मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीची परिस्थिती लक्षात घेता. बदलत्या राजकीय समीकरणामुळे काँग्रेस आणि भाजपा समोर 'कोण किती पाण्यात 'आहेत. याचे मोजमाप करण्याचे मोठे आव्हान राजकीय दोन्ही पक्षापुढे आहेत. सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभेत निवडणुकीत भाजप उमेदवार हंसराज अहिर यांना 5 ,14,774 मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांना 5, 59,507 मते मिळाली होती. वंचित चे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना 1, 12 , 079 मते मिळाली होती. त्यात काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांचा 44,733 मतांनी विजयी झाला होता. आता 2024 च्या निवडणुकीत वेगळे समीकरण असणार आहेत.
भाजपात पहिल्यांदा असे झाले की 40 वर्षात उमेदवारीसाठी टोकाच्या संघर्ष करावा लागला. पहिले पक्षाचे उमेदवार ठरलेले असायचे. आतापर्यंत देशात 17 लोकसभा निवडणुका झाल्या त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दहा वेळा काँग्रेसचे खासदार, चार वेळा भाजपचे खासदार, तीन वेळा अपक्ष निवडून आले. यापूर्वी सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनीभाजपा कडून दोनदा लोकसभा लढवले त्यात त्याना पराभव पत्कवा लागला. त्यानंतर सलग 29 वर्षापासून विधानसभेचे आमदार आहेत. तीनदा चंद्रपूर, तीनदा बल्लारपूर येथून निवडून आलेत. आणि तब्बल पुन्हा 32 वर्षांनी सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आले. पण लोकसभा निवडणूक लढवण्यास अजिबात इच्छुक नाहीत ,असे असतानाही भाजपानी आणि मेरीट उमेदवार सुतोवाच केले. परंतु सुधीर मुनगंटीवार यांनी मला 2024 ची लोकसभा निवडणूक लढायची आहे असे संकेत दिले होते.
दिवंगत विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी वरोरा भद्रावती क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर ह्या काँग्रेस पक्षाकडून मैदानात उतरवले. अनेक संघर्षातून प्रतिभा धानोरकर यांना आखरी संघर्षात उमेदवारी बहाल करण्यात आली. आता पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात मोठी खळबळ माजली असली तरी, काँग्रेस पक्ष लोकसभेसाठी ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी इंडिया आघाडीने राहण्याचे सर्व कार्यकर्त्यांनी जाहीर केले. तसेच कुणबी महासंघाकडून जातीचे पाठबळ असल्याचे दाखवून दिले. एकंदरीत हुकूमशाही विरोधात लोकशाही असा नारा घेऊन प्रतिभा धानोरकर मैदानात उतरले आहेत.
काँग्रेस मधील अंतर्गत वादाची बंडखोरी आणि भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची नाराजी हे या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून येणार आहे! भूतकाळातील लोकसभेच्या निवडणुकीचे पाहता. आता वेदनिश्चित घेता येईल. निवडणुकीत फुटीर पक्षाने राजकीय पक्षाचा तिरंगी लढतीत त्याचा फायदा कुण्या एका पक्षाला होतो याचा आतापर्यंत इतिहास राहिला आहे.
उमेदवारांनी काढलेल्या रॅलीचे संख्या उमेदवाराचा विजय नसतो. अशा गर्दींना खरी वाट नसते. आज इकडे तर उद्या तिकडे! असा खेळ सुरू असतो. कार्यकर्ता खाऊ पिऊन नारे द्यावे हे त्याची दोन तोंडी भूमिका असते.
खरा समाजातील आरसा ज्याकडे पाहिले जाता तो समाज दलित, मुस्लिम, आदिवासी, बहुजनवादी समाज मताने
भाजप पेक्षा काँग्रेसकडे अधिक झुकाव प्रकर्षाने जाणवतो. याना समाजाला कोण किती आकर्षित करतो यावर अवलंबून राहणार आहे.
आता जनतेला सर्व काही कडून चुकले आहे .दोन्ही राजकारणी उमेदवार एक एकमेकांच्या पायदंड्यावर शितोळे उडवत आहेत. तीन दशके सक्रिय राजकारणात घालवणारा माणूस कच्च्या गुरुचा चेला कसा राहू शकतो! परिपक्व राजकारणी, द्रष्टा नेता म्हणून अख्या महाराष्ट्रात ओळखल्या जातो. प्रतिभा धानोरकर आमदार राजकारणी पतीच्या मुसीतून त्यांच्याकडे राजकारणाचा आव -बाज चांगलाच कळतो. लोकांची मानसिकता ही विकासाला अभिप्रेत असते. म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे. जनतेच्या कौल निर्णायक विजय असेल. नागरिकांनी मात्र प्रशासनाच्या जनजागृती मतदान मोहिमेला भरभरून प्रतिसाद द्यावा!