जखमी राजू डोंगरेच्या कुटुंबीयाला तत्काळ आर्थिक मदत द्या अन्यथा आंदोलनाचा पत्रकार परिषदेत इशारा




जखमी राजू डोंगरेच्या कुटुंबीयाला तत्काळ आर्थिक मदत द्या

अन्यथा आंदोलनाचा पत्रकार परिषदेत इशारा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : मूल एमआयडीसीतील जीआर क्रिष्णा येथे रंगरंगोटीची कामे करताना राजू डोंगरे या कामगाराचा हात मशीनच्या पट्ट्यात दबल्याने मोठी दुखापत झाली आहे. मात्र, कंपनीने मदत देण्यास हात वर केले आहे. तर कंत्राटदारांनी उपचार करून सोडून दिले आहे. परंतु, हाताच्या दुखापतीमुळे डोंगरे यांचा हात निकामी झाल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने राजू डोंगरे यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या सरिता मालू, समाजवादी पार्टीचे सोहेल शेख यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

मूल एमआयडीसी येथील जीआर क्रिष्णा कंपनीत रंगरंगोटी काम करीत असताना राजू डोंगरे यांचा कामगारांचा हात कापला गेला. कंत्राटदाराने याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती न देता त्याला चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात भरती केले. यानंतर रुग्णालयातून उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. मात्र, एका हात निकाम झाल्याने मजुरीचे काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटदार विलास वनकर आणि कंपनी व्यवस्थापनाने त्याला आर्थिक मदत देणे आवश्यक होते. परंतु, दोघांनीही हात वर केले आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या सरिता मालू यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत याबाबतचे निवेदन देत जखमी मजुराला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा जखमी कामगार आणि त्याच्या कुटुंबीयाला घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पत्रकार परिषदेला सरिता मालू, सोहेल शेख, जखमी कामगाराची पत्नी अल्का डोंगरे, मीनाक्षी करिये आदी उपस्थित होते,