दहा दिवसापासून विक्रेत्याकडे 100 चे स्टॅम्प नसल्याने नागरिकांची ससेहोलपट nondani and mudrank chandrapur




दहा दिवसापासून विक्रेत्याकडे 100 चे स्टॅम्प नसल्याने नागरिकांची ससेहोलपट

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील कार्यालयात स्टॅम्प विक्रेत्यांकडे शंभर रुपयांचं स्टॅम्प नसल्याने मागील दहा दिवसापासून नागरिकांना मजबुरीने पाचशे रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागत आहे.
स्टॅम्प मिळावा यासाठी सकाळी आठ वाजता पासून नोंदणी व मुद्रांक कार्यालयात नागरिकाची झुंबड दिसून येत आहे. अखेर नागरिकांनी त्रासून आज आपला मोर्चा जिल्हा कोषागार कार्यालयात वळवला.
संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यावर स्टॅम्प चा पुरवठा झाला असून स्टॅम्पची नोंदणीकृत ऑनलाइन माहिती तयार व्हायची आहे. तांत्रिक अडचणीमुळे व सरकारकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे ऑनलाइन नोंदणी होण्यास उशीर होत आहे अशी माहिती दिली.
परंतु जर नोंदणी झाली नाही तर स्टॅम्प विक्रेत्यांना 50, 50 अशा प्रकारचे शंभर रुपयाचे स्टॅम्प कशाच्या आधारावर विक्री दिल्या जातात. त्यामुळे अत्यंत गरजवंत नागरिकाला रांगेत लागूनही स्टॅम्प मिळत नाही. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी शेवटी प्रशासकीय भवनातील जिल्हा निर्बंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अंकिता तांदळे यांच्या कार्यालयात जाऊन संबंधित स्टॅम्प विक्रेत्याबद्दल तोंडी तक्रार केली. त्या म्हणाल्या की, शंभर रुपयाचे स्टॅम्प स्टॅम्प विक्रेत्याकडे उपलब्ध नसल्यास. सेतू केंद्रातून शंभर रुपयाच्या चालन पावतीवर नागरिकांनी आपले काम करून घ्यावे. परंतु सेतू केंद्रात नागरिक शंभर रुपयाच्या चालन वर काम करण्यास गेल्यास, कुठलेही काम चालन पावती व करून देण्यास सेतुधारक स्पष्ट नकार देत असल्याने मजबुरीने त्यांना शंभर रुपयाचा स्टॅम्प  ऐवजी पाचशे रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागतो. सामान्य माणसाला आपल्या रोजी रोटी सोडून  पाचशे रुपये खर्च करणे अवघड जात असल्याने. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकाची ससेहोलपट पाहता लवकरात लवकर 100 रुपयाचे स्टॅम्प विक्रीस उपलब्ध करून द्यावे अशी मागणी. रंजीता खेलवडे,  वैशाली मते,  वर्षा काळे, सुनील दुद्दनाथ, शिवम  चिवंडे, आशा मासुरकर, यास अनेक महिलांनी केली आहे.