जनतेच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी? राजच्या प्रश्नाने अधिकारी निरुत्तर!
विकसित भारत संकल्प योजनेचा प्रचार- प्रसार!
दिनचर्या न्युज :-
कोल्हापूर:-
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका ग्रामपंचायत सोन्याची शिरोली येथील ग्रामस्थ आणि सविधान समितीचे राज्य सचिव राज वैभव शोभा रामचंद्र यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाची अडवणूक केली. झालेल्या विकसित भारत यात्रेच्या रथावर संपूर्ण मोदी सरकार आणि लहान अक्षरात भारत सरकार असं लिहिण्यात आल्याने राजने संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले की पूर्ण रथावर मोदी सरकारच का लिहिल्या गेलं भारत सरकार का नाही? या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले. केंद्र सरकारच्या प्रसारा करिता मोदी सरकार असे का लिहून प्रचार करता याचे उत्तर द्या नंतरच रथ न्या, आपल्या राज्यातील किंवा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा! भाजप सरकारच्या प्रचार आहे की, सरकारच्या योजनेचा प्रचार आहे . जनतेच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी.हे जोपर्यंत आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत इथून रथ जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने सोन्याची शिरोली येथे अधिकाऱ्यांची गोची झाली. या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमचा रथ का अडवला असे म्हटल्यावर राजनि हा रथ भाजपचा आहे का ?यांना विचारण्याचा अधिकार आहे का! आमच्यावर गुन्हे दाखल करा असा म्हणण्याचा अधिकार यांना आहे का?
असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत असल्याने चांगली चर्चा राज्यभरात होत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना घेऊन शासकीय अधिकारी गावागावात योजनेचा प्रचार प्रसार करीत आहेत. मात्र सोन्याची शिरोली येथे राज वैभवने मोदी सरकारच का लिहिलं असा प्रश्न घेऊन अधिकाऱ्यास प्रश्नाचे उत्तर देण्यास बाधित केले.
योजना ची माहिती ग्रामस्थाच्या हातात फलके देऊन देण्यात येते. योजनेची माहिती देत असताना अनेक ठिकाणी कुठेही भारताचा झेंडा नसून ठळक अक्षरात भारत सरकार नसून फक्त मोदी सरकारची योजना अनेक ठिकाणी लिहिल्याने हा गावकऱ्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला. राज्यात यापूर्वी 400 चा गॅस मिळत होता आता उज्वलाच्या नाव्याने 1000 रुपयाचा गॅस नागरिकांना घ्यावा लागतो. आरोग्य सेवेच्या बाबतीत ही आरोग्यसेवा केंद्र सरकारची की मोदी सरकारची असाही प्रश्न केला. या प्रश्नाची उत्तर देता आली नाही. आणि धर्म संकटात अडकल्यासारखे झाले. असे म्हणण्याची वेळ आली 'राजा बोले दाढी हाले 'असा प्रकार अधिकाऱ्यांचा झाला.